शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फिरकेनात पालिकेत

By admin | Updated: March 29, 2017 01:55 IST

गेल्या १५ वर्षांत महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा वावर कायम होता.

पिंपरी : गेल्या १५ वर्षांत महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा वावर कायम होता. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागला. राष्ट्रवादी काँग्र्रेस पक्षाची सत्ता गेली. भाजपाने बहुमत मिळवून सत्ता काबीज केली आहे. सत्ता गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा महापालिकेतील वावर कमी झाला असून, भाजपा कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली आहे.यापूर्वी विरोधी पक्षाचे साधारण १४ ते १५ नगरसेवक असत. त्यामुळे विरोधी पक्षाला दिलेला कक्ष पुरेसा पडत होता. या निवडणुकीनंतर भाजपा सत्तेत आली. विरोधी बाकावर बसण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसवर आली. भाजपाचे ७७, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ३६ नगरसेवक आहेत. विरोधी पक्षासाठी उपलब्ध करून दिलेला कक्ष ३६ नगरसेवकांना बसण्यास पुरेसा नाही. त्यामुळे मोठ्या आकाराची जागा असलेला कक्ष उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांकडून होऊ लागली आहे. पूर्वी पक्षनेत्यांच्या, तसेच महापौरांच्या कक्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नेहमी हजेरी लावायचे. पक्षाच्या कार्यक़्रमांची, तसेच अन्य बैठका व कार्यक्रमांचे नियोजन त्या ठिकाणी व्हायचे. आता मात्र पुरेशी जागा उपलब्ध होत नाही, हेच शल्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बोचते आहे. त्यांनी त्यासाठी आंदोलनाचीही भूमिका घेतली आहे. (प्रतिनिधी)सत्ताधारी म्हणून वावरण्याची जाईना सवयसत्ताधारी म्हणून वावरण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मानसिकता अद्यापही तशीच आहे. त्यामुळे त्यांना त्रास होऊ लागला आहे. भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आता अधिकचा उत्साह संचारला आहे. यापूर्वी कधी तरी महापालिकेत फेरफटका मारणारे कार्यकर्ते अलीकडच्या काळात नियमित महापालिका कार्यालयात दिसून येत आहेत. सत्ताबदलाबरोबर कार्यकर्त्यांमध्येही बदल घडून आल्याचे जाणवू लागले आहे.