शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा प्रदेशच्या नावांवर शिक्कामोर्तब

By admin | Updated: May 20, 2017 05:09 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी भाजपाचे माउली थोरात, बाबू नायर, मोरेश्वर शेडगे आणि राष्ट्रवादीचे भाऊसाहेब भोईर, संजय वाबळे यांच्या नावावर

- लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी भाजपाचे माउली थोरात, बाबू नायर, मोरेश्वर शेडगे आणि राष्ट्रवादीचे भाऊसाहेब भोईर, संजय वाबळे यांच्या नावावर शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अखेर अंतिम शिक्कामोर्तब झाले. भाजपाकडून प्रदेशने सुचविलेलीच नावे अंतिम ठेवण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या दोन्ही आमदार व समर्थकांनी निवडीच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याची चर्चा आहे. महापौर नितीन काळजे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. राजकीय पक्षांच्या संख्याबळानुसार पाच जणांची महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड करावयाची होती. त्यानुसार भाजपाकडे तीन तर राष्ट्रवादीकडे दोन स्वीकृत नगरसेवकपद आले. भाजपाने मोरेश्वर शेडगे, माउली थोरात आणि बाबू नायर यांची, तर राष्ट्रवादीने भाऊसाहेब भोईर व संजय वाबळे यांची नावे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र, थोरात आणि नायर यांच्या नावावरून आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी राडा केला होता. पिंपरीतील भाजपाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले होते. यावरून भाजपाकडून स्वीकृतची नावे बदलणार असल्याची चर्चा होती. मात्र, पालकमंत्री गिरीश बापट यांनी स्वीकृतच्या नावाबाबत कोणताही बदल होणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले होते. दरम्यान, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पाचही जणांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्याचा प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवला होता. त्यामुळे भाजपाच्या नावांबाबत अनेकांना उत्सुकता होती. मात्र, भाजपा प्रदेशने पाठविलेल्या तीनही नावांवर सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब करण्यात आले. स्वीकृतच्या नावांची घोषणा झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी स्थानिक नेत्यांपैकी केवळ खासदार अमर साबळे सभागृहात उपस्थित होते.नोटीसचे वाचन, न्यायालयात जाण्याची सूचनारिपब्लिकन पक्षाचे पिंपरी विधानसभा अध्यक्ष केतन कांबळे यांनी माउली थोरात यांचे अनधिकृत बांधकाम असल्याचे, तर बाबू नायर हे स्वीकृत नगरसेवकपद मिळविण्यासाठी दाखविलेल्या संस्थेचे पदाधिकारी नसल्याने त्यांची स्वीकृतपदी निवड करता येत नसल्याचे आयुक्तांना बजावण्यात आलेल्या कायदेशीर नोटिसीत म्हटले होते. नगरसचिवांनी नोटीसचे वाचनही केले. आयुक्तांनी या पाचही जणांची स्वीकृतपदी निवड करण्याचा प्रस्ताव महासभेपुढे मंजुरीसाठी ठेवला असून या विषयास मंजुरी द्यावी, अशी सूचना विरोधी पक्षनेते योेगेश बहल यांनी केली. कोणाला आक्षेप असल्यास त्यांनी न्यायालयात दाद मागावी, असेही त्यांनी नमूद केले. त्यानंतर याविषयास मंजुरी देण्यात आली. पोलीस बंदोबस्तस्वीकृतसाठी भाजपाकडून जाहीर करण्यात आलेल्या नावांवरून भाजपाच्या कार्यालयासमोर राडा झाला होता. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेतील स्वीकृतच्या निवडीवेळी महापालिका परिसरात मुख्य प्रवेशद्वारासह सभागृहात कडेकोट पोलीस बंदोबस्त होता.