शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मजूर खूनप्रकरणी दोघांना अटक, अनैतिक संबंधातून खून झाल्याचे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 02:07 IST

चिखलीतील पाटीलनगर येथील दगडाच्या खाणीत एका मजुराचा मृतदेह शुक्रवारी पोलिसांना आढळून आला. आकस्मिक मृत्यूची नोंद करून या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला

पिंपरी - चिखलीतील पाटीलनगर येथील दगडाच्या खाणीत एका मजुराचा मृतदेह शुक्रवारी पोलिसांना आढळून आला. आकस्मिक मृत्यूची नोंद करून या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता, महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधातून तिच्या प्रियकराने आणखी एकाच्या मदतीने या डोक्यात दगड घालून मजुराचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विजय प्रल्हाद सोळंके (वय ४०, रा. भांगरे कॉलनी, चिखली) असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी रविवारी आरोपींना अटक केली आहे.धन पठाणीराणा कामी (वय २५,रा. सोनवणेवस्ती, चिखली, मूळ नेपाळ) आणि त्याचा चुलतभाऊ खेमराज राणा कामी (रा. रावेत, मूळ नेपाळ) अशी आरोपींची नावे आहेत. धन कामी याच्या प्र्रेयसीबरोबर सोळंके याचे अनैतिक संबंध असल्याचे समजल्यानंतर चिडलेल्या आरोपीने चुलत भावाच्या मदतीने हे कृत्य केले. महिलेच्या माध्यमातून सोळंके याला आरोपींनी पाटीलनगर, शेलारवस्तीजवळील खाणीत बोलावून घेतले. आरोपी त्या ठिकाणी सोळंके यास जिवे मारण्यासाठी दबा धरून बसले होते. सोळंके महिलेला भेटण्यासाठी येताच, त्यातील एकाने त्यास पकडले. दुसऱ्याने दोरीच्या साह्याने गळा आवळला. खाली पडताच डोक्यात दगड घातले. नंतर मृतदेह पाण्यात फेकून दिला. आरोपींनी गुन्हा घडल्यानंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, परिमंडल तीनचे उपायुक्त मंगेश शिंदे, सहायक आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक रवींद्र जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे, पोलीस निरीक्षक एल एन सोनवणे, पोलीस कर्मचारी संदीप पाटील यांच्या पथकाने कारवाई केली.मूळचे वाशीमचे असलेले विजय हे सध्या चिखलीत राहत होते. ते दगडखाणीवर मजुरीचे काम करीत होते. शुक्रवारी सकाळी ते घरातून बाहेर गेले होते. मात्र, परत आले नाहीत. सायंकाळी पाचच्या सुमारास दगड खाणीजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तपास केला असता हा खून असल्याचे उघड झाले आहे.

टॅग्स :Murderखूनnewsबातम्या