शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकाम करणाऱ्या डिलाइट डेव्हलपर्सच्या पाठीशी पालिका अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 03:12 IST

अधिकाऱ्यांचा निरस्तचा अहवाल; आयुक्तांच्या फेरतपासणीच्या आदेशानंतर संगनमत आले उजेडात

पिंपरी : महापालिकेत मोजणीची खोटी कागदपत्रे व नकाशा सादर करून डिलाइट डेव्हलपर्स हा बांधकाम व्यावसायिक व मूळ मालक यांनी चºहोली येथे १२ मजल्यांच्या दोन टोलेजंग इमारतीचा ‘इको पार्क’ हा गृहप्रकल्प उभा केला. महापालिकेतील बांधकाम विभागाच्या अधिकाºयांच्या संगनमताशिवाय बिल्डरला हे अशक्य होते. त्यामुळे बिल्डरला पाठीशी घालणाºया अधिकाºयांनी अर्जदाराची तक्रार निरस्त करण्याचा अहवाल जून २०१८ मध्ये आयुक्तांना सादर केला. मात्र, आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत गृहप्रकल्पाच्या बांधकामाला स्थगिती देऊन तातडीने खुलासा मागविला. त्यानंतर अर्जदाराने पुराव्यानिशी विकसक व अधिकाºयांच्या संगनमताने खोटी कागदपत्रे व नकाशे सादर करून बांधकाम परवानगीचे प्रकरण उजेडात आले.महापालिकेच्या हद्दीतील चºहोली बुद्रुक येथील सर्व्हे नंबर ५०६ (जुना स. नं. ९७६) येथे डिलाइट डेव्हलपर्स यांच्या वतीने ६५ एकर जागेवर ‘इको पार्क’ नावाने गृहप्रकल्प उभारण्यात येत आहे. बारा मजली दोन इमारतींचे काम पूर्णत्वास आले असून, तिसºया इमारतीचे काम सुरू आहे. मूळ जागामालक प्रकाश गुलाब तापकीर आणि डिलाइट डेव्हलपर्सतर्फे दिनेश रावजीभाई पटेल यांनी २०१५ मध्ये महापालिकेकडून बांधकाम परवानगी मिळविली. त्यासाठी विकसकाने या प्रकल्पाच्या शेजारी असलेल्या जमिनीच्या मोजणीचे नकाशे व कागदपत्रे सादर करून परवानगी (कमिस्मेंट सर्टिफिकेट) मिळविली. परंतु, प्रत्यक्ष जागेवर पाहणी केल्याशिवाय सर्वसामान्य नागरिकांना बांधकाम परवाना मिळत नाही. मग, अधिकाºयांनी बांधकाम सुरू करण्याची परवानगी प्रत्यक्ष स्थळपाहणी न करता व मूळ कागदपत्रांची छाननी न करता कशी काय दिली, असा प्रश्न उपस्थित होतो.अधिकाऱ्यांमुळे सदनिकाधारक अडचणीतचºहोली येथील जमीन मूळ जागामालक प्रकाश तापकीर यांनी आनंद सरवदे यांना यापूर्वीच २००१ मध्ये विकली आहे. मात्र, सहाऐवजी १२ मजल्यांची मंजुरी घेण्यासाठी विकसकाने शेजारच्या जागेत अतिक्रमण करीत पत्रे ठोकले. त्या वेळी मोजणीनुसार नकाशावर जागा नसतानाही अधिकाºयांनी स्थळ पाहणी अहवाल सकारात्मक कसा दिला? आता हे प्रकरण अंगलट आल्यानंतर विकसकाचा परवाना रद्द करण्यात आला. मात्र, महापालिका अधिकाºयांच्या दुटप्पीपणामुळे या गृहप्रकल्पात सदनिकांची आगाऊ नोंदणी करणारे ग्राहक अडचणीत आले आहेत. त्यामुळे विकसकाप्रमाणे महापालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकाºयांनाही दोषी ठरवून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिका