शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेपूर्वीच होणार महापालिका निवडणुका - रामदास आठवले

By नारायण बडगुजर | Updated: August 12, 2023 22:07 IST

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षाची शनिवारी पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी येथे पत्रकार परिषद झाली.

पिंपरी : पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांपूर्वीच राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका होण्याची शक्यता आहे. डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये या निवडणुका होतील, अशी शक्यता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वर्तवली आहे.  

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षाची शनिवारी पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी रामदास आठवले बोलत होते. आठवले म्हणाले, ‘सबका साथ सबका विकास’ या भूमिकेमुळे आमचा ‘आरपीआय’ पक्ष ‘एनडीए’सोबत आहोत. या सरकारच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेक स्मारकांचे संवर्धन झाले. कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी तयार रहायला पाहिजे. पक्षबांधणीसाठी राज्यात विविध शिबिरे आयोजित केली आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत आरपीआयला दोन जागा मिळण्याची मागणी करणार आहे. 

नागालँडमध्ये आमच्या पक्षाचे दोन आमदार निवडून आले. त्यामुळे तेथे आमच्या पक्षाला मान्यता मिळाली. अशीच मान्यता महाराष्ट्रात मिळावी, यासाठी विधानसभा निवडणुकीतही काही जागांची मागणी करणार आहे. आमच्या पक्षाची मुंबईतही मोठी ताकत आहे. विदर्भात देखील समाज मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे शिर्डी, मुंबई किंवा विदर्भ यापैकी कोणत्याही दोन जागा लोकसभा निवडणुकीत मिळाव्यात, अशी मागणी करणार आहे.  

संविधान बदलणार असल्याच्या अफवाएनडीए किंवा भाजप सरकार संविधान बदलणार आहेत, अशा अफवा पसरविल्या जात आहेत. मात्र, या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये. संविधान अजिबात बदलणार नाही. लोकसभेच्या अगोदर महापालिका, जिल्हा परिषद या निवडणुका होण्याची शक्यता आहे. डिसेंबर, जानेवारीमध्ये या निवडणुका होऊ शकतात. त्यात पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत १४ ते १५ जागांची मागणी करणार आहे. त्यातील सात- आठ जागांवर कार्यकर्त्यांना संधी मिळू शकते, असे आठवले म्हणाले. 

विरोधकांचा गोंधळमणिपूरच्या संदर्भातील चर्चा संसदेत व्हायला हवी होती. ती चर्चा विरोधकांच्या गोंधळामुळे होऊ शकली नाही. संसदीय अधिवेशनात पहिल्या दिवसापासून सरकारने त्यासंबंधी चर्चा करण्याचे मान्य केले होते. मात्र, चर्चा न होऊ देण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरबाबतची स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही रामदास आठवले म्हणाले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड