शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

पर्यावरण संतुलनासाठी महापालिकेचा पुढाकार, आदर्श सोसायटीला देणार बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:11 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत पर्यावरण संतुलनासाठी महापालिका विविध उपक्रम राबवित आहे.

पिंपरी : स्वच्छ भारत अभियानांतर्गत पर्यावरण संतुलनासाठी महापालिका विविध उपक्रम राबवीत आहे. शहर हगणदरीमुक्त करणे, घनकच-याचे व्यवस्थापन करणे या अभियानांतर्गत औद्योगिकनगरीला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातूनच शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांचा सहभाग वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेतर्फे आदर्श पर्यावरण संतुलित सोसायटी बक्षीस योजना राबविण्यात येणार असून, विजेत्या सोसायट्यांना सामान्यकरात सूट देण्यात येणार आहे.केंद्र सरकारतर्फे सुरू करण्यात आलेले स्वच्छ भारत अभियान २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत शहरे हगणदरीमुक्त करणे व घनकच-याचे व्यवस्थापन करून शहर स्वच्छ करणे ही दोन प्रमुख उद्दिष्टे आहेत. केंद्राच्या धर्तीवर १५ मे २०१५ पासून राज्यातही स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फेही शहरातील विविध स्वयंसेवी संस्था, सहकारी गृहनिर्माण संस्था, नागरिक यांच्या सहयोगाने हे अभियान राबविले जात आहे. आता या अभियानांतर्गत नागरिकांचा सहभाग वाढवून शहरातील गृहप्रकल्पांमध्ये पर्यावरणपूरक आणि स्वच्छताविषयक स्पर्धा घेण्याचे महापालिकेने ठरविले आहे. त्यामुळे शहर स्वच्छ व पर्यावरणपूरक होईल, कच-याची वाहतूक होऊन विल्हेवाट करण्यासाठी महापालिका आणि अन्य शासकीय यंत्रणेवर पडणारा अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होणार आहे. त्यासाठी आदर्श पर्यावरण संतुलित सोसायटी बक्षीस योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. २०१७ ते २०२० या तीन वर्षांच्या कालावधीत ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. यातील विजेत्या सोसायट्यांना सामान्यकरात सूट देण्यात येणार आहे. १२ ते १०० फ्लॅट, बंगलो, रो हाऊस असलेली सोसायटी आणि १००हून अधिक फ्लॅट, बंगलो, रो हाऊस असलेली सोसायटी अशा दोन गटांसाठी ही स्पर्धा असणार आहे. आठ क्षेत्रीय कार्यालयांतून आठ सोसायट्यांची या स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे.तपासणीसाठी स्वतंत्र पथकसोसायटीसंदर्भातील या स्पर्धेच्या तपासणीसाठी दोन पालिका अधिकारी, एक अशासकीय संस्थेचा प्रतिनिधी व एक पत्रकार यांचे पथक असणार असून, त्यांनी दिलेल्या स्टार रेटिंग गुणांच्या आधारे संबंधित सोसायटीला सामान्य करात सूट देण्यात येणार आहे. त्यामध्ये ८६ ते १०० गुण मिळविणा-या सोसायटीला फाईव्ह स्टार रेंटिंग असणार असून, त्यांना सामान्य करात १५ टक्के सूट दिली जाणार आहे. ७६ ते ८५ गुण असणा-या व फोर स्टार रेटिंगच्या सोसायटीला १० टक्के, तर ६६ ते ७५ गुण प्राप्त व थ्री स्टार सोसायटीला पाच टक्के सामान्यकरात सवलत देण्यात येणार आहे. ही सवलत महापालिकेतर्फे देण्यात येत असलेल्या सामान्य करातील सवलतींव्यतिरिक्त असणार आहे. ५१ ते ६५ गुण मिळविणा-या सोसायटीला दोन स्टार व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.