शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
2
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
3
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
4
चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर
5
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
7
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
8
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? कोण मेले कोणासाठी..?
9
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
10
ये क्या था भाई? 'कमली कमली' गाण्यावर सुनिधी चौहानचा विचित्र डान्स, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
12
शाब्बास पोरी! प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूने घेतलं हक्काचं घर, कांची शिंदेंने शेअर केले फोटो
13
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांची टीका
14
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
15
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
16
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
17
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
18
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
19
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
20
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
Daily Top 2Weekly Top 5

मुळशीत राष्ट्रवादीची सत्ता

By admin | Updated: February 24, 2017 02:54 IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागील जिल्हा परिषद पंचायत समितीतील मिळवलेले यश कायम राखत पुन्हा

हिंजवडी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागील जिल्हा परिषद पंचायत समितीतील मिळवलेले यश कायम राखत पुन्हा एकदा तालुक्यावर सत्ता मिळवली आहे. राष्ट्रवादीने तब्बल चार जागांवर विजय मिळवत पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व राखले. जिल्हा परिषद गटातही दोन जागांवर विजय मिळवला. काँग्रेस व तालुक्यात नवख्या असलेल्या भाजपाला मात्र तालुक्यात खाते उघडता आले नाही. पंचायत समितीच्या उर्वरित दोन जागा व जिल्हा परिषदेची एक जागा मिळवण्यात शिवसेनेला यश आले. मुळशीतील पंचायत समितीच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी कासार-आंबोली येथील मुलींच्या सैनिकी शाळेत गुरुवारी सकाळी १० वाजता सुरू झाली. यात पौड गणात राष्ट्रवादीच्या कोमल वाशीवले (५८५२ मते) यांनी भाजपाच्या शिल्पा ठोंबरे यांचा पराभव केला. शिवसेनेच्या सचिन साठे (४९९९) यांनी राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष सुनील वाडकर याना पराभूत केले. राखीव असलेल्या बावधन गणात शिवसेनेच्या विजय केदारी (४६१० मते) यांनी राष्ट्रवादीच्या जीवन कांबळे यांचा पराभव केला. माजी सभापती महादेव कोंढरे यांच्या पत्नी राधिका कोंढरे (६०७९ मते) यांनी पिरंगुट गणातून बाजी मारली. त्यांनी शिवसेनेचे माजी सभापती बाळासाहेब पवळे यांच्या पत्नी संगीता पवळे यांचा पराभव केला. जिल्हा परिषदेच्या बावधन-पिरंगुट गटात अंजली कांबळे (९६४४ मते) यांनी शिवसेनेच्या शारदा ननावरे यांना पराभूत केले. राखीव असलेल्या पौड कासार-आंबोली गटात शिवसेनेच्या सागर कासकर (११,८९२ मते) मिळवत राष्ट्रवादीच्या गणपत जाधव यांचा पराभव केला. हिंजवडी-माण जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचे शंकर मांडेकर (९४६८ मते) यांनी विजय मिळवत राष्ट्रवादीचा गड राखला. त्यांनी काँग्रेसच्या शिवाजी बुचडे यांचा पराभव करत तालुक्यातील एकमेव सर्वसाधारण जागेवर वर्चस्व मिळवले. तर हिंजवडी गणात शिवसेनेच्या प्राची बुचडे यांचा पराभव करत कोमल बुचडे (३३३६ मते) यांनी विजयश्री खेचून आणली. या गणात अपक्ष असलेल्या सीमा जगताप यांनी घेतलेल्या मतांमुळेदेखील निकालामध्ये मोठा बदल झाल्याचे स्पष्ट होत आहे. माण गणात अपेक्षेप्रमाणे पांडुरंग ओझरकर (६८३२ मते) यांनी बाजी मारली. त्यांनी शिवसेनेच्या प्रकाश भेगडे यांचा १६७७ मतांनी पराभव केला. (वार्ताहर)