शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

संघटनात्मक बदलाच्या हालचाली, महापालिकेतील पराभवानंतर शिवसेनेला जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 04:57 IST

महापालिका निवडणुकीत शिवसेनेस आलेले अपयश, यामुळे शहर शिवसेनेत संघटनात्मक बदलाचे संकेत पक्षप्रमुखांनी दिले आहेत.

पिंपरी : महापालिका निवडणुकीत शिवसेनेस आलेले अपयश, यामुळे शहर शिवसेनेत संघटनात्मक बदलाचे संकेत पक्षप्रमुखांनी दिले आहेत. शहरप्रमुख, विधानसभाप्रमुख, महिला अशा सर्व आघाड्यांमध्ये बदल करण्यात येणार आहे.खासदार श्रीरंग बारणे यांनी गजानन चिंचवडे यांचे नाव लावून धरले आहे, तर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख सुलभा उबाळे यांचे नाव लावून धरले आहे. शहरप्रमुखावरून स्थानिक नेत्यांमध्ये एकमत करण्यासाठी सोमवारी बैठक होणार आहे. शिवसेना शहरप्रमुखपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता आहे.महापालिका निवडणुकीत २०१२ मध्ये १४ जागा शिवसेनेला मिळाल्या होत्या. लोकसभा निवडणुकीपूर्वी सीमा सावळे आणि आशा शेंडगे यांच्यावर निलंबनाची तोंडी कारवाई केली होती. २०१७च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेस नऊ जागा मिळाल्या. महापालिका निवडणुकीत दोन्ही खासदार आणि संपर्क नेते डॉ. अमोल कोल्हे यांनी गांभीर्याने लक्ष घातले नाही. भाजपा जेवढ्या प्रमाणावर आक्रमक झाली होती, त्या प्रमाणात शिवसेना नेत्यांनी लक्ष घातले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी सक्षम उमेदवार देता आले नाहीत. भाजपाच्या संघनीतीपुढे शिवसेनेला पराभव पत्करावा लागला. तीनवरील भाजपा ७६ वर गेली. तर १४ वरून शिवसेनेचे संख्याबळ नऊवर आले. महिला आघाडी प्रमुख सुलभा उबाळे यांचा पराभव झाला. पक्षाच्या कामासाठी वेळ मिळत नसल्याने कोल्हे हे जबाबदारीतून मुक्त झाले आहेत. त्यामुळे हे रिक्त झाले आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेनेनेही पक्षसंघटना बळकट करण्यासाठी मातोश्रीवर नुकतीच बैठक घेतली. त्यात शहरपातळीवर बदलाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे शहर कार्यकारिणीत बदल होणार आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना