शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नोटबंदीच्या विरोधात आंदोलन, निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 05:06 IST

नोटबंदीच्या निषेधार्थ अनेक संस्था, संघटनांनी आंदोलन करून निषेध नोंदवला. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वराज्य अभियान, शेतकरी कामगार पक्ष नागरी हक्क सुरक्षा समिती यासह अनेक

पिंपरी : नोटबंदीच्या निषेधार्थ अनेक संस्था, संघटनांनी आंदोलन करून निषेध नोंदवला. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वराज्य अभियान, शेतकरी कामगार पक्ष नागरी हक्क सुरक्षा समिती यासह अनेक संस्था सहभागी झाल्या होत्या. तर भाजपाच्या वतीने हा दिवस काळा पैसाविरोधी दिन म्हणून साजरा करण्यात आला. रिपब्लिकन पक्षातर्फे व्हाइट मनीदिन साजरा करण्यात आला.पिंपरी : देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी, देशाच्या आर्थिक फायद्यासाठी आणि सामान्य माणसांच्या हितासाठी पंतप्रधानांनी एक वर्षापूर्वी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. त्यामुळे दहशतवादी, काळा पैसा बाळगणारे आणि खोट्या नोटा वापरणाºयांचा तोटा झाला, तर भविष्यात सामान्यांना नक्कीच फायदा होणार आहे, असे प्रतिपादन दि इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट्स आॅफ इंडियाच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे उपाध्यक्ष अमोल भाटे यांनी बुधवारी केले.नोटाबंदीच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाले. भाजपाच्या वतीने हा दिवस देशभर काळा पैसाविरोधी दिन म्हणून साजरा केला. त्यानिमित्त शहर भाजपाच्या वतीने आॅटो क्लस्टर सभागृहातील कार्यक्रमास अमोल भाटे यांनी नोटाबंदीचा निर्णय का योग्य आहे?, याबाबत मार्गदर्शन केले. या वेळी भाजपा शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, प्रदेश सदस्य उमा खापरे, सदाशिव खाडे, सरचिटणीस सारंग कामतेकर, प्रमोद निसळ, अमोल थोरात उपस्थित होते.अमोल भाटे म्हणाले, ‘‘नोटाबंदीचा निर्णय योग्य होता. देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी, देशाच्या फायद्यासाठी आणि सामान्यांच्या हितासाठी घेतलेला हा निर्णय आहे.त्याचा देशभरातील असंख्यलोकांना त्रास झाला. परंतु, कोणताही बदल घडवायचा असेल, तर त्रासाशिवाय शक्य नाही. या निर्णयाचा सामान्य आणि गरिबांऐवजी काळा पैसा असणाºयांनाच मोठा त्रास झाला. काळा पैसा बँकेत भरायचा कसा, असा प्रश्न त्यांच्यापुढे होता. भविष्यात चांगले दिवस नक्कीच दिसणार आहेत. देशातील केवळ ५ ते १० टक्के लोक कर भरतात. ९० टक्के नागरिक कर भरत नाहीत. कर भरण्याचे प्रमाण वाढवण्याचा नोटाबंदीचा उद्देश आहे. देश चालवण्यासाठी पैसा हवा असतो. कर भरण्याचे प्रमाण वाढले, तर विकासकामांसाठी वापर करता येईल. यापुढे आॅनलाइन व्यवहारावर भर देण्याची गरज आहे.’’आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, ‘‘एक वर्षापूर्वी देशातून भ्रष्टाचार समूळ नाश व्हावा, दहशतवादाचे उच्चाटन व्हावे, परदेशातील काळा पैसा नष्ट व्हावायासाठी नोटाबंदीचा ऐतिहासिक निर्णय घेतला. देशभरातील सर्व नागरिक या निर्णयाच्या पाठीशी राहिले. सुरुवातीला त्रास झाला. मात्र, उज्ज्वल भविष्यासाठी नागरिकांनी हा त्रास सहन केला. कोणत्याही गोष्टीचा लगेच परिणाम दिसणार नाही. चांगला परिणाम येण्यासाठी निश्चित काहीकाळ लागेल. येत्या तीन-चार वर्षांत नोटाबंदीचा फायदा होत असल्याचे दिसेल.’’व्हाईट मनी डे साजरापिंपरी : रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया आठवले गट पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शहर अध्यक्ष सुधाकर वारभुवन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व्हाईट मनी डे साजरा करण्यात आला. राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशावरून संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर कार्यक्रम राबविण्यात आला. या प्रसंगी अनेक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केले. तसेच नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्याने नोटाबंदीचे समर्थन करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब भागवत, नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, सम्राट जकाते, अशोक गायकवाड, भरत खरात, विलास गरड, नितीन गायकवाड, बापू गायकवाड, रत्नमाला सावंत, राघू बनसोडे, राहुल खुने, दिलीप समिंदर आदी उपस्थित होते.भारिप महासंघतर्फे निषेधपिंपरी : केंद्र सरकारच्या नोटबंदी निर्णयाला वर्ष झाले. मात्र एकाही प्रश्नाची सोडवणूक झाली नाही. या सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार भारिप बहुजन महासंघ, पिंपरी-चिंचवड शहरतर्फे पिंपरीत लुटारूंचा दिवस आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.आंदोलनात भारिप बहुजन महासंघ, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, भारत कुंभारे, सुधीर कांबळे, सुधाकर साबळे, संजय खरात, संतोष जोगदंड, मिलिंद केदारी, सुभाष गवळी, राजू बनकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Note Banनोटाबंदी