पिंपरी : शेती व आपला पारंपरिक व्यवसाय सुरू ठेवून, तरुण पिढीला उच्च शिक्षण देऊन एमपीएससी व यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी आपण प्रवृत्त केले पाहिजे, असे आवाहन खासदार श्रीरंग बारणे यांनी निगडी येथे केले. नाशिकचे आमदार योगेश घोलप यांना ‘समाजरत्न आणि पिंपरी चिंचवडमधील नोव्हेल ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष अमित गोरखे यांना शिक्षणरत्न पुरस्कार खासदार बारणे यांच्या हस्ते आणि महापौर शकुंतला धराडे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर संयोजक रमेश साळवे, स्वागत समिती सदस्य नगरसेवक तानाजी खाडे, माजी नगरसेवक शशिकिरण गवळी, भीमा बोबडे, संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, समितीचे अध्यक्ष अरुण सोनवणे, महिला अध्यक्षा सविता सोनवणे, सचिव लखन हुलसुरे व दत्तात्रय शिंदे आदी उपस्थित होते. रविवारी निगडी प्राधिकरणातील संत गुरू रविदास मंदिर येथे संत गुरू रोहिदासमहाराज यांच्या ६३९व्या जयंती सोहळ्याचे उद्घाटन संत रोहिदास यांच्या प्रतिमेस महापौर धराडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यानंतर वधू-वर परिचय मेळावा संपन्न झाला. स्वागत, प्रास्ताविक साळवे यांनी केले. शुभांगी शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. शशिकिरण गवळी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
तरुणांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रवृत्त करावे
By admin | Updated: March 1, 2016 00:53 IST