शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, एकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 18:28 IST

तू मला फार आवडतेस, मी तुझे दुसरे कोणाबरोबर लग्न होऊन देणार नाही. तुझे घरचे लोकांना आपले दोघांचे लफडे आहे असे सांग’, असे बोलून एका सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला दमदाटी...

चाकण : ‘तू मला फार आवडतेस, मी तुझे दुसरे कोणाबरोबर लग्न होऊन देणार नाही. तुझे घरचे लोकांना आपले दोघांचे लफडे आहे असे सांग’, असे बोलून एका सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला दमदाटी करून विनयभंग केल्या प्रकरणी चाकण येथील महात्मा फुके नगर मधील एकावर आज ( दि. ९ ) विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक फौजदार दत्तात्रय जाधव यांनी दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम शिवाजी जगताप ( रा. महात्मा फुलेनगर, चाकण, ता.खेड, जि.पुणे ) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. दिनांक ३० मार्च ते ९ एप्रिल दरम्यान प्रेम हा या मुलीचा महात्मा फुलेनगर ते शिवाजी विद्यालय दरम्यान छुपा पाठलाग करीत होता. दिनांक ३० मार्च रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास महात्मा फुलेनगर येथील प्रसाधन गृहाजवळ अडवून त्याने या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४४/२०१८, भादंवि कलम ३५४ (ड), बाललैंगिक अत्याचार कायदा कलम २०१२ चे ११ व १२. नुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दत्तात्रय जाधव हे पुढील तपास करीत आहेत..