लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : माण, हिंजवडी, मारुंजी, कासारसाई या परिसरात केवळ मौजमजेसाठी मोबाईलची चोरी करणारा १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला गुरुवारी हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. त्याच्याकडून सुमारे ३ लाखांचे ३० मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश तुकाराम माळी (वय २५, रा. मारुंजी, हिंजवडी) यांनी मोबाईल चोरीला गेल्याची फिर्याद हिंजवडी पोलीस ठाण्यात दिली. दरम्यान, पोलिसांना हद्दीत गस्त घालत असताना एक जण मोबाईलची विक्री करण्यासाठी संत तुकाराम साखर कारखान्यासमोर येणार असल्याची माहिती मिळाली होती. या वेळी पोलिसांना कारखाना परिसरात सकाळी साडेनऊच्या सुमारास एक मुलगा काळी बॅग घेऊन येताना दिसला. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडील बॅग तपासली. त्यात मोबाईल सापडले. त्याच्याकडे चौकशी केली असता पहाटे त्याने माळी यांच्या घरातून मोबाईल चोरल्याचे कबूल केले आहे.
सव्वातीन लाखांचे मोबाईल जप्त
By admin | Updated: May 12, 2017 05:17 IST