शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या माहितीचा गैरवापर, मार्केटिंगचा नवा फंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 03:41 IST

सध्या मार्केटिंगचे युग आहे. प्रत्येकजण आपापले ‘प्रॉडक्ट’ विकण्यासाठी नवनवीन पद्धतींचा अवलंब करीत आहे. शहर परिसरात काही ‘पॉलिसी’ विक्रीसाठी, तसेच विविध कोर्सची माहिती देऊन मार्केटिंग करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांकडून मिळविलेल्या माहितीचा गैरवापर होत आहे. त्यामुळे पालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

तळवडे  - सध्या मार्केटिंगचे युग आहे. प्रत्येकजण आपापले ‘प्रॉडक्ट’ विकण्यासाठी नवनवीन पद्धतींचा अवलंब करीत आहे. शहर परिसरात काही ‘पॉलिसी’ विक्रीसाठी, तसेच विविध कोर्सची माहिती देऊन मार्केटिंग करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांकडून मिळविलेल्या माहितीचा गैरवापर होत आहे. त्यामुळे पालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. काही सामाजिक संस्थांकडून शाळा, महाविद्यालयात विविध स्पर्धा राबविल्या जातात. यामध्ये चित्रकला, निबंधलेखन, सामान्य ज्ञान यांसारख्या परीक्षांचे आयोजन केले जाते. त्यासाठी शुल्क आकारले जात नसल्यामुळे सर्वच विद्यार्थी सहभागी होत असतात. परंतु अशा परीक्षा घेताना विद्यार्थ्याचे नाव, इयत्ता, तुकडी, पत्ता आणि पालकांचा संपर्क क्रमांक अशा स्वरूपाच्या माहितीचे संकलन केले जाते. काही कालावधीनंतर पालकांना आपल्या पाल्याने आम्ही घेतलेल्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. त्याचे गुणपत्रक, प्रमाणपत्र, बक्षीस घेण्यासाठी अमुक पत्त्यावर यावे, तसेच येताना पती आणि पत्नी दोघांनाही येणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. पालक ही सर्व माहिती ऐकून सांगितलेल्या ठिकाणी जातात. तेथे गेल्यावर बरेचसे लोक आलेले असतात. तुमचा पाल्य खूप हुशार आहे. त्याने आम्ही घेतलेल्या परीक्षेत छान गुण मिळविले असून, त्याबद्दल त्याला पारितोषिक देत आहोत. त्याची अमुक रकमेची ‘पॉलिसी’ आम्ही काढत आहोत. त्याचे नियमित हप्ते भरल्यावर वयाच्या वीस, एकविसाव्या वर्षी ठरावीक रक्कम मिळेल. भविष्यात तुमच्या पाल्याच्या शिक्षणासाठी त्याचा उपयोग होईल, असे सांगण्यात येते. संबंधित ‘पॉलिसी’चे हप्ते भरण्याची गळ पालकांना घातली जाते.पालकांनी सतर्क राहण्याची गरजपालकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. शाळा आणि महाविद्यालयात घेतलेल्या स्पर्धा व शासकीय परीक्षा यांची गुणपत्रके, प्रमाणपत्र आणि बक्षिसे यांचे वाटप हे त्याच ठिकाणी केले जाते. त्यामुळे अशा प्रकारच्या फोनवर विश्वास ठेवून तेथे जाऊ नये, असे आवाहन शाळा आणि महाविद्यालयांतर्फे करण्यात येत आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीMarketबाजार