शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शाळेत न जाता बेपत्ता झालेली मुले अखेर सापडली; निगडीतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 15:20 IST

शाळेत शिकणारे पाचवीतील चार विद्यार्थी सकाळी शाळेत स्कूल बस मधून आली आणि शाळेत न जाताच बेपत्ता झाले होते. ११.००च्या दरम्यान ही मुले प्राधिकरण सेक्टर २८, संत ज्ञानेश्वर उद्यान जवळ सापडली.

ठळक मुद्देशालेय प्रशासनाने तातडीने हाती घेतली शोध मोहीमअनुचित प्रकार घडण्यापूर्वी पालकांनी आणि शालेय प्रशासनानेसुद्धा दक्ष राहणे आवश्यक

रावेत : वाल्हेकरवाडी आणि जांबे येथील रहिवासी व निगडी प्राधिकरणातील एका शाळेत शिकणारे पाचवीतील चार विद्यार्थी सकाळी शाळेत स्कूल बस मधून आली आणि शाळेत न जाताच बेपत्ता झाले होते. सकाळी साडेसहा वाजता शाळेत जाण्यासाठी घरातून निघाले होते. प्रत्यक्षात ते शाळेत गेले परंतु वर्गात गेले नाही, ही बाब शिक्षकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शालेय प्रशासनास तातडीने माहिती दिली त्यानंतर शालेय प्रशासनाने तातडीने शोध मोहीम हाती घेतली.सकाळी ७.३० च्या दरम्यान आकुर्डी येथील शाळेतील प्राथमिक वर्गातील ४ मुले, वर्गात न बसताच निघून गेली. शालेय प्रशासनाच्या ही बाब त्वरित लक्षात आली. सर्व मुले १० ते ११ वर्षीय असल्याने तत्काळ शोध घेत शाळेच्या स्कूल व्हॅनचा चालक विद्यार्थ्यांना शोधत प्राधिकरणातील संत ज्ञानेश्वर उद्यानात आल्यावर येथे फेरफटका मारणारे नागरी कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी त्यांच्या कडे चौकशी केली, तेव्हा त्यांनी सांगितले, की चार शाळकरी मुले वर्गात न जाता शाळेपासून निघून गेली आहेत. या घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन पाटील यांनी समितीच्या सदस्यांना फोन वरून कळविले व तत्काळ शोध मोहीम सुरू केली. बस चालक, शिक्षक आणि प्राधिकरण नागरी सुरक्षा सामितीचे कार्यकर्ते शोधाशोध करू लागले. अखेर ११.००च्या दरम्यान ही मुले प्राधिकरण सेक्टर २८, संत ज्ञानेश्वर उद्यान जवळ सापडली आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. या मुलांना जवळ घेऊन त्यांना बोलते केले. तेव्हा वेगवेगळी कारणे या विद्यार्थ्यांनी सांगितली. ही मुले सुखरूप पणे शालेय प्रशासनाकडे सुपूर्त केली. अखेर सर्वांचा जीव भांड्यात पडला.या प्रसंगी प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी पालकांनी आणि शालेय प्रशासनानेसुद्धा दक्ष राहणे आवश्यक आहे, मुले हरवणे किंवा निघून जाणे या बाबत सर्व शालेय प्रशासनाने तसेच शासकीय प्रशासनाने गांभिर्याने घेतले पाहिजे. या बाबत विशेष प्रबोधन आणि दक्षता आवश्यक आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड