शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

मिसेस लोणावळा व्यक्तिमत्त्व स्पर्धा, मोनाली कुलकर्णी, दीपाली देखणे यांचा नगर परिषदेतर्फे गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 05:54 IST

जागतिक महिला दिनानिमित्त लोणावळा नगर परिषद व महालक्ष्मी महिला मंच यांच्या वतीने महिलांकरिता आयोजित मिसेस लोणावळा व्यक्तिमत्त्व स्पर्धेत अ‍ॅड. मोनाली कुलकर्णी सौभाग्यवती लोणावळाच्या मानकरी ठरल्या

लोणावळा : जागतिक महिला दिनानिमित्त लोणावळा नगर परिषद व महालक्ष्मी महिला मंच यांच्या वतीने महिलांकरिता आयोजित मिसेस लोणावळा व्यक्तिमत्त्व स्पर्धेत अ‍ॅड. मोनाली कुलकर्णी सौभाग्यवती लोणावळाच्या मानकरी ठरल्या, तर लकी ड्रॉमध्ये दीपाली देखणे या भाग्यवान विजेत्या ठरल्या. त्यांना अ‍ॅक्टिवा गाडी भेट देण्यात आली.लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, मुख्याधिकारी सचिन पवार, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, तळेगावचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके, माजी उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड, नगरसेवक राजू बच्चे, महावितरण समितीचे सदस्य सुनील तावरे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विनय विद्वांस, भाजपाचे माजी शहराध्यक्ष राजेंद्र चौहान, भाजयुमोचे अरुण लाड, हर्षल होगले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तर बक्षीस वितरण समारंभ मावळचे माजी आमदार दिगंबर भेगडे, युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय गुंड, नगरसेवक भरत हारपुडे व मान्यवर यांच्या हस्ते करण्यातआले.कार्यक्रमाची सुरुवात लोणावळ्याच्या नगराध्यक्षा व सर्व नगरसेविका यांनी रॅम्प वॉक करत लोणावळा शहरात सुरू असलेली विकासकामे व भविष्यात करण्यात येणारी कामे, स्वच्छतेचे महत्त्व, कचºयाचे वर्गीकरण याबाबत अनोख्या पद्धतीने माहितीदिली.४८ महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. निवेदिका सरोज राव यांनी या स्पर्धेचे निवेदन व आयोजन केले होते. महिलांच्या सौंदर्य स्पर्धेसह विविध बौद्धिक ज्ञानाच्या चाचण्या या वेळी घेण्यात आल्या. अंतिम फेरीत अ‍ॅड. मोनाली कुलकर्णी या सौभाग्यवती लोणावळा या किताबाच्या मानकरी ठरल्या, तर स्पर्धेतील द्वितीय क्रमांक डॉ. राणी राहुल भालेराव, तृतीय क्रमांक उमा राजेश मेहता यांना देण्यात आला. यासह अपूर्वा कांबळे (उत्कृष्ट स्मितहास्य), हर्षा घोलप (उत्कृष्ट वेशभूषा), सारिका पडवळ (उत्कृष्ट कला), सोनाली कोराड (उत्कृष्ट उत्तरे), नेहा रवींद्र गायकवाड (उत्कृष्ट व्यक्तिमत्त्व) यांना सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमादरम्यान शहरात स्वच्छतादूत म्हणून काम करणाºया कचरावेचक महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून तृप्ती रोमारे, सुषमा कोठारी, रुपाली पाटील यांनी केले,तर कार्यक्रमाचे निवेदन सरोज रावव सूत्रसंचालन राजेंद्र दिवेकर यांनी केले.लोणावळा शहरात सुरू असेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये उत्कृष्ट काम करत लोणावळा शहराला देश पातळीवरील स्पर्धेत अव्वलस्थानी पोहचविण्याकरिता अविरतपणे प्रयत्न करत राहिलेल्या लोणावळा नगरीच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या नावाची स्वच्छ सर्वेक्षण २०१९ करिता ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून घोषणा करण्यात आली. मुख्याधिकारीसचिन पवार यांच्या हस्ते जाधवयांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.देहूरोडला महिलांचा सन्मान४देहूरोड येथील अशोक टॉकीज कंपाउंड येथे विविध क्षेत्रांतील महिलांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी मावळ तालुका सोशल मीडिया अध्यक्ष सूर्यकांत सुर्वे, भाजपाच्या महिला माजी अध्यक्षा उषा रोकडे, सारिका मुथा उपस्थित होत्या. उपस्थित महिलांना गुलाबपुष्प देऊन व केक कापून सन्मानित करण्यात आले. पनिर बोटले, आजमभाई शेख यांनी सहकार्य केले. देहूरोड भाजपा अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष हनिफ शेख यांनी संयोजन केले.कामशेतमध्ये गुणगौरव४कामशेत : जागतिक महिला दिनानिमित्त कामशेत पोलीस ठाण्यात महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करून गुणगौरव करण्यात आला. ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय. एस. पाटील यांनी महिला कर्मचाºयांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असून त्यांच्या आपण सलाम केला पाहिजे असे पाटील यांनी सांगितले. या वेळी ठाणे अंमलदार पुष्पा घुगे यांच्यासह शुभांगी पाटील, गौरी औचार, काजल राऊत, ऐश्वर्या पाचल आदी महिला पोलीस कर्मचाºयांचा सत्कार करण्यात आला. या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय. एस. पाटील, सहायक फौजदार धेंडे, संतोष घोलप, संदीप शिंदे, दत्तात्रय खंडागळे, मिथुन धेंडे, दत्ता शिंदे, भाग्यवंत व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.लोणावळ्यात सत्कार४लोणावळा : जागतिक महिला दिनानिमित्त महिला मंडळ लोणावळा व मैत्रीण ग्रुप लोणावळा यांच्या वतीने महिला मंडळ हॉल या ठिकाणी पाणीपोई सुरू करण्यात आली आहे. तसेच गोरगरिबांना अन्नदान करण्यात आले. महिला मंडळ व मैत्रीण ग्रुपच्या अध्यक्षा मनीषा बंबोरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या वेळी प्रिया मेहता, प्राची पाटेकर, तृप्ती घोगळा, कविता पाठा, स्वाती पारख, शोभना कांकरिया, निर्मला गायकवाड, धारप आदी महिला उपस्थित होत्या. 

टॅग्स :lonavalaलोणावळाWomen's Day 2018महिला दिन २०१८