शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवादी हल्ला झाला, तर आम्ही जशास तसे उत्तर देणार"; जयशंकर यांनी अमेरिकेतून पाकिस्तानला फटकारलं
2
युद्धाच्या फुसक्या धमक्यांचे 'बार' सोडणाऱ्या बिलावल भुट्टोंचं 'भिरभिरं' जमिनीवर; म्हणाले, 'भारतासोबत...'
3
आईनं मुलाचा मुलीप्रमाणे श्रृंगार केला, आनंदात फोटो काढले अन् संपूर्ण कुटुंबाने एकाच वेळी जीवन संपवले! नेमकं काय घडलं?
4
ENG vs IND : गिल-जड्डू जोडी जमली! अर्धा संघ तंबूत परतल्यावर टीम इंडियानं साधला 'त्रिशतकी' डाव
5
कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरून अंतर्गत कलह सुरू असतानाच सरकारचा मोठा निर्णय; २ शहरांची नावं बदलली
6
आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल
7
कॅप्टन्सीत शतकी 'रोमान्स'! शुबमन गिलनं मारली विराटसह या दिग्गजांच्या क्लबमध्ये एन्ट्री
8
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
9
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापले रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाले- "त्याच्या हातातून..."
10
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
11
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?
12
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे
13
खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)
14
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
15
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
16
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
17
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
18
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
19
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
20
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य

अल्पवयीन दुचाकीस्वारांकडे वाहतूक पोलिसांचे होतेय दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 02:40 IST

वाहतूक नियमांची पायमल्ली; छेडछाडीच्या घटनांत वाढ

कामशेत : कामशेत शहरासह आजूबाजूच्या परिसरामध्ये मागील काही वर्षांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण झपाट्याने वाढले असून, त्यातही अल्पवयीन दुचाकीचालक मुलांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या अल्पवयीन चालकांकडून वाहतुकीच्या नियमांची सातत्याने पायमल्ली होत असताना पोलीस प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार अनेक ज्येष्ठ नागरिक करीत आहेत.शाळा, खासगी शिकवणी व इतरत्र जाण्यासाठी मुले पालकांच्या मर्जीने वा मर्जीशिवाय दुचाकी वाहनांचा सर्रास वापर करतात. शहरातून ट्रिपल सीट अथवा चौबल सीट बसून वेड्यावाकड्या पद्धतीने जोरात वाहन चालवून कर्णकर्कश हॉर्न वाजवतात. त्याचबरोबर वाहतुकीच्या नियमांचेदेखील त्यांच्याकडून उल्लंघन केले जाते. मुलींना कट मारणे व छेडछाड आदी प्रकार घडत आहेत. विनापरवाना वाहन चालवणाऱ्या या अल्पवयीन वाहन चालकांकडे स्थानिक पोलिसांचे सोईस्कर दुर्लक्ष होत आहे. पोलीस ठाण्याचा कारभार सकाळी दहानंतर सुरु होत असल्याने, तसेच शहरातील वाहतूककोंडी व वाहतुकीच्या इतर समस्या सोडवण्यापेक्षा महामार्गावर चिरीमिरी गोळा करण्यात वाहतूक पोलीस व्यस्त असल्याने कामशेत शहरातील मुख्य रस्त्यांवर या अल्पवयीन मुलांचे फावले आहे.विनापरवाना वाहन चालवणे, ट्रिपल सीट बसणे, जोरजोरात व कर्कशपणे हॉर्न वाजवणे, शाळा परिसर व गर्दीच्या ठिकाणी वेगात वाहन चालवणे, रस्त्यावरील वाहनांना व पादचाºयांना कट मारणे, विशेषत: मुलींना कट मारणे याचप्रमाणे वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने वाहन लावणे आदी प्रकार या अल्पवयीन व हुल्लडबाज मुलांकडून होत असतात. याकडे त्यांच्या पालकांबरोबरच पोलीस प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असल्याने शहर व परिसरात किरकोळ अपघात घडत आहेत. यातूनच एखादा मोठा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिक विचारात आहेत.अल्पवयीन मुलांचे वाहन चालवणे अनेक पालकांना भूषणावह वाटत असून, काही पालक तर आपल्या मुलांकडे दुचाकी वाहन देऊन त्याच्या मागे ऐटीत बसत असल्याचे चित्र दिसत आहे. तर अनेक अल्पवयीन मुले आपल्या पालकांना रेल्वे स्टेशन व इतरत्र सोडवण्याची जबाबदारी पार पाडताना दिसत आहेत. त्याचमुळे अनेक पालक शाळा-कॉलेज-शिकवणी वा इतरत्र जाण्यासाठी मुलांना दुचाकीवाहन बिनदिक्कत देत असल्याने मुलांकडून त्याचा गैरवापर होत आहे. वाहतूक पोलिसांच्या उदासीनतेमुळे अनेक मुलांना पोलिसांची भीतीही उरलेली नाही. त्यामुळे रस्त्याने येजा करणाºया पादचाºयांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे़ कारण आपण व्यवस्थित चाललो असलो तरी कधी कोण कुठून आणि कसा येईल याची शाश्वती राहिली नाही़ त्यामुळे ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना रस्त्याने येजा करणे कठीण होत आहे. हुल्लडबाज तरुणांचा धिंगाणाकामशेतच्या मुख्य रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून, सर्वत्र खडीचे साम्राज्य आहे. या खड्ड्यांमधून व खडीतून जोरात गाडी चालवून अपघात होत आहेत. काही हुल्लडबाज तरुण वाहनाच्या सायलेन्सरमध्ये तांत्रिक बदल करून फटाक्याच्या स्फोटाचे आवाज काढतात. तर रात्रीच्या वेळी गाडीच्या हेडलाइटमध्ये झगमगाटाचे दिवे लावून इतर वाहनचालकांना त्रासदायक ठरत असून समोरील रस्ता दिसत नाही. त्यामुळे मोठा अपघात होण्याचा धोका आहे. वाहतूक पोलीस याकडे काणाडोळा का करीत आहेत, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.शहरात व महामार्गावर अल्पवयीन दुचाकीचालकाला पकडून मुलांच्या पालकांवर गुन्हा दाखल केल्यास अल्पवयीन दुचाकी, चारचाकी चालवणाºया मुलांवर व त्यांच्या पालकांवर जरब बसेल व अनेक छोटे-मोठे अपघात होणार नाहीत. तसेच मुलींना त्रास होणार नाही, असे लोकांकडून बोलले जात आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडtraffic policeवाहतूक पोलीस