शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले...
2
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
3
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
4
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
5
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
6
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
7
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
8
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
9
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
10
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
11
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
12
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
13
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
14
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
15
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
16
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
17
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
18
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
19
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
20
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन

गवळ्या घरी दूध लागले नासायला

By admin | Updated: April 25, 2015 05:01 IST

उन्हाची वाढलेली दाहकता आता दुग्ध व्यावसायिकांना जेरीस आणू लागली आहे. उकाड्यामुळे दूध नासण्याचे प्रकार वाढू लागल्याने गवळ्यांचे मोठ्या प्रमाणात

अंकुश जगताप, पिंपरीउन्हाची वाढलेली दाहकता आता दुग्ध व्यावसायिकांना जेरीस आणू लागली आहे. उकाड्यामुळे दूध नासण्याचे प्रकार वाढू लागल्याने गवळ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे या दिवसांत जनावरांची काळजी घेण्यासह दूध टिकविण्याच्या उपाययोजना करण्याचे आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी करीत आहेत. मागील ४ दिवसांतच तापमानात कमालीची वाढ झाली आहे. उन्हाचा परिणाम दुग्ध व्यवसायावर मोठ्या प्रमाणात दिसत आहे. मावळ, मुळशी तालुक्यांतील बहुतांश शेतकऱ्यांचा दुग्ध व्यवसाय हा प्रमुख जोडधंदा आहे. अनेक शेतकरी ५ ते १० जनावरे पाळतात. त्यांचे दूध पिंपरी-चिंचवड, पुण्यात विकून मिळणाऱ्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र सध्या उन्हामुळे उद्भवलेल्या स्थितीतून व उकाड्यामुळे हे दूध ग्राहकापर्यंत पोहोचण्यापूर्वीच नासून खराब होत आहे. बहुतेक व्यावसायिक ग्रामीण भागातील आहेत. त्यांच्याकडे शीतकरण सुविधा नसते. त्यामुळे सायंकाळी धार काढल्यानंतर दूध बादलीत अथवा पातेल्यामध्ये भरून ठेवले जाते. सकाळी उठल्यावर भांड्यातील सर्वच दूध खराब झाल्याचे वा त्याला आंबट वास येत असल्याचा प्रत्यय येत आहे. विशेषत: सकाळी दूध तापविताना महिलांना ही बाब लक्षात येत आहे. परिणामी गवळ्याच्या हातात पैसे मिळेनासे झाले आहे. उलटपक्षी आपले नेहमीचे ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी दूधभट्टीवरून इतर गवळ्यांकडून दूध विकत घ्यावे लागत आहे. सध्या वीस लिटर दूध विकत घेण्यासाठी दोन ते अडीच हजार रुपये खर्च करण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. त्यामुळे तोटाच सहन करावा लागत असल्याचे गवळ्यांनी सांगितले. गाई-म्हशींना उन्हामुळे निर्जलीकरण, उन्हाचे चटके बसून आजारी पडण्याचे प्रकार होण्याचा धोका वाढला आहे. ताथवडे येथील वळूमाता प्रक्षेत्राचे व्यवस्थापक डॉ. अनिल देशपांडे यांनी विविध उपाययोजना सुचविल्या आहेत. दुधाची करा जपणूकधार काढताना वापरले जाणारे भांडे, जनावराची कास चांगल्या प्रकारे धुवावी. जेणेकरून दुधाला जंतुसंसर्ग होणार नाही. शक्यतो दूध फ्रिजमध्ये ठेवावे. गावी हे शक्य नसल्यास दूध बादलीमध्ये ठेवून ती मोकळ्या हवेत व ओले फडके गुंडाळून ठेवावी. शक्यतो दूध रात्रीच तापवावे. गवळ्यांनी दूध विक्रीस नेताना ओल्या फडक्याने घागर, कॅन झाकावे. अधूनमधून त्यावर पाणी शिंपडावे.