शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोच्या भोंगळ कारभाराने अडकली बीआरटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 06:31 IST

: मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील स्वारगेट ते पिंपरी मार्गाच्या कामांमुळे दापोडी-निगडी बीआरटीचा प्रकल्प अडचणीत आला आहे. बीआरटी मार्गाचे काम पूर्णत्वास आले

विश्वास मोरेपिंपरी : मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील स्वारगेट ते पिंपरी मार्गाच्या कामांमुळे दापोडी-निगडी बीआरटीचा प्रकल्प अडचणीत आला आहे. बीआरटी मार्गाचे काम पूर्णत्वास आले असताना महामेट्रोकडून विनापरवाना खोदाई सुरू आहे़ मुख्य लेन तोडल्यामुळे बीआरटी कॉरिडोअरवर केलेला २४ कोटींचा खर्च वाया जाणार आहे. बीआरटी मार्ग सुरू होण्यास मेट्रो कामाचा अडथळा आहे.महापालिकेच्या दापोडी ते निगडी बीआरटी मार्गाला न्यायालयाने हिरवा कंदील दिला. तरी मेट्रोच्या कामामुळे पुन्हा एकदा बीआरटी प्रकल्पाचा नव्याने आराखडा व नियोजन करावे लागणार आहे. मेट्रोकडून कामांची दुरुस्ती झाल्यानंतरच वाहतूक सेवा सुरू करावी लागणार आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहराची सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने मेट्रो प्रकल्प राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात पिंपरी ते स्वारगेट हा टप्पा होत आहे. पिंपरी ते स्वारगेट हे अंतर १४.५ किलोमीटर आहे. तर त्यावर १४ बसथांबे आहेत. निगडी ते पिंपरी या मार्गावर सहा थांबे असणार आहेत. मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, मेट्रो रेल प्रकल्प आणि महापालिका यांच्या समन्वयाचा अभाव असल्याने त्याचा आर्थिक फटका बसत आहे.पालिकेने थांबविले खोदाईचे कामबीआरटीमार्गातच मोरवाडी ते एम्पायर इस्टेट पुलापर्यंत खोदाई केली आहे. ही खोदाई महापालिकेला विचारून न केल्याने महापालिकेने हे काम थांबविले आहे. बीआरटी मार्गात खोदाई करताना मेट्रोने महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे. ते न घेतल्याने खोदाईचे काम अर्धवट स्थितीत थांबविले आहे. या महिनाभरात या मार्गावरून सुरू होणाऱ्या बीआरटी सेवेला खोडा बसणार आहे. नियोजनाच्या अभावामुळे मेट्रोमुळे बीआरटी मार्ग अडचणीत आला आहे.नियोजनाअभावीबीआरटीचे नुकसानपिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात काम करताना मेट्रोने महापालिकेच्या अधिकाºयांशी संवाद साधणे गरजेचे आहे. मात्र, मनमानी पद्धतीने काम सुरू आहे. पिंपरी ते निगडी हा बीआरटी मार्ग महिनाभरात सुरू करण्याचे नियोजन केले होते. मात्र, पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामुळे पुतळा उद्यानाच्या जवळून ग्रेड सेपरेटरच्या बाजूने बीआरटी लेनमधूनच पीलरसाठी रस्ता खोदला आहे. त्यामुळे खराळवाडीतील लेन तोडली आहे.आंबेडकर चौक ते मोरवाडीपर्यंत महापालिकेसमोरून मेट्रोचे खांब उभारणार होते. ते खांब आता ग्रेड सेपरेटरच्या बाजूने घेतले जाणार आहे. त्यामुळे अगोदरच अरुंद असणाºया रस्त्यावरील बीआरटी मार्गांतून मेट्रो मार्ग जाणार असल्याने मोरवाडीतून पिंपरीत येण्यास बीआरटीला अडथळा निर्माण होणार आहे. मोरवाडी ते एम्पायर इस्टेट पुलापर्यंतच्या बीआरटी मार्गात खोदाई सुरू केली आहे.दहा वर्षे रखडला प्रकल्प, मार्गावरच खोदाईपुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी या बीआरटी मार्गाच्या कामाला २००९ मध्ये मंजुरी मिळाली होती. मात्र, एकाच मार्गावर ग्रेड सेपरेटर, बीआरटी आणि सामान्य नागरिकांच्या वाहनांसाठी लेन असल्याने या मार्गावर बीआरटी सुरू करणे अडचणीचे ठरले होते. तसेच या मार्गाचे सेफटी आॅडिट न झाल्याने या मार्गाविरोधात न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यामुळे दहा वर्षे हा प्रकल्प रखडला आहे. या मार्गावर ३६ बस स्थानके उभारण्यात आली आहेत. त्यापैकी २२ स्थानके ही महापालिकेने आणि १४ स्थानके ही बीव्हीजीने उभारली होती. त्यानंतर गेल्यावर्षी सिग्नल यंत्रणेवरही कोट्यवधींचा खर्च करण्यात आला. बीआरटी लेनचे काम पूर्ण झाल्यानंतर मेट्रोने काम सुरू केले आहे. मेट्रोच्या कामासाठी बीआरटीची लेन आणि दुभाजकही तोडण्यात आले आहेत. केंद्र सरकारचे काम असल्याने महापालिका प्रशासनही या खोदाईकडे दुर्लक्ष करीत आहे. तसेच या मार्गावर काही वर्षांपूर्वीच नव्याने पथदिवे बसविण्यात आले होते. तेही काढण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिकेला मेट्रोचे काम झाल्यानंतर पथदिवे दुरुस्तीचा खर्च करावा लागणार आहे.