शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

मैलामिश्रित सांडपाणी थेट नदीपात्रात; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 02:05 IST

मैलामिश्रित सांडपाणी थेट नदीपात्रात जात असल्याने सांगवी परिसरातून वाहणाºया मुळा आणि पवना या नद्या प्रदूषित झाल्या आहेत.

पिंपळे गुरव : मैलामिश्रित सांडपाणी थेट नदीपात्रात जात असल्याने सांगवी परिसरातून वाहणाºया मुळा आणि पवना या नद्या प्रदूषित झाल्या आहेत. पिंपळे गुरवमधील स्मशानभूमीच्या पाठीमागे ड्रेनेज फुटल्याने पिंपळे गुरवमधील जवळकरनगर, वैदुवस्ती परिसरातील सांडपाणी थेट नदीपात्रात जात आहे.तसेच जुनी सांगवीतील शितोळे पेट्रोल पंपाच्या विरुद्ध बाजूला पुणे महापालिकेच्या हद्दीत संपूर्ण औंध गावाचे सांडपाणी थेट नदीपात्रात जात आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून ड्रेनेजचे पाणी नदीपात्रात येत असूनही पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिका प्रशासन याकडे काणाडोळा करीत आहे. चेंबर दुरुस्त करून नदीपात्रात येणारे पाणी थांबवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.मुळा नदीपात्राचीही वेगळी परिस्थिती नाही. पिंपळे निलखपर्यंत स्वच्छ असणारे नदीपात्र सांगवीनजीक प्रदूषणामुळे बरबटून गेले आहे. संपूर्ण औंधचे पाणी वाहून नेणारी ड्रेनेज लाईन सांगवीजवळ फुटल्याने गेल्या कित्येक महिन्यांपासून संपूर्ण मैलापाणी नदीपात्रात जात आहे. याकडे पुणे महापालिका प्रशासन मात्र डोळेझाक करीत आहे. यामुळे जुनी सांगवी परिसरात प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यातआले आहे. मुळा नदीपात्रात येणारे हे मैलापाणी रोखण्याची मागणी जुनी सांगवीतील मधुबन सोसायटीतील नागरिकांनी केली आहे.माजी नगरसेवक राजेंद्र जगताप म्हणाले की, एवढ्या मोठ्या प्रमाणात मैलायुक्त पाणी नदीपात्रात जात असताना याकडे दुर्लक्ष आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वीच या ड्रेनेज लाइनचे काम केले आहे. तरीही निकृष्ट कामामुळे ही लाइन फुटली आहे. याचा फटका पिंपळे गुरव, सांगवीकरांना बसत आहे. त्यामुळे नदीपात्रात येणारे मैलापाणी लवकरात लवकर रोखण्यात यावे.याबाबत नगरसेवक सागर आंगोळकर म्हणाले की, मैलामिश्रित सांडपाणी नदीपात्रात मिसळत असल्याच्याठिकाणी काम करणार आहे. याबाबत ताबडतोब आरोग्य विभागाशी संपर्क करून काम पूर्ण करणार आहे. नदीपात्रात कोणत्याही प्रकारची घाण, कचरा नागरिकांनी टाकू नये.