शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

जैन युवकांचे संमेलन, देशभरातील सातशे प्रतिनिधींचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 02:10 IST

निगडी प्राधिकरण : देशभरातील सातशे प्रतिनिधींचा सहभाग

पिंपरी : निगडी प्राधिकरणातील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने अखिल भारतीय जैन सोशल आॅर्गनायझेशनच्या पाचव्या अखिल भारतीय जैन युवक संमेलनाचे आयोजन शनिवारी व रविवारी होणार आहे, अशी माहिती निमंत्रक नितीन बेदमुथा यांनी दिली आहे. निगडी प्राधिकरणातील पाटीदार भवनात शनिवारी सकाळी नऊला संमेलनाचे उद्घाटन प्रकाश धारिवाल यांच्या हस्ते होणार आहे.

स्वागताध्यक्ष पद मनोहरलाल लोढा भूषवणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ उद्योगपती राजेंद्र सांकला, प्रकाश पारख, विजयकांत कोठारी, पोपट ओस्तवाल, बाळासाहेब धोका, सुनील नहार, प्रा. अशोक पगारिया, सुरेश गादिया, मोहन संचेती, सुरेश शेठीया आणि जैन सोशल आॅर्गनायझेशनचे शहराध्यक्ष तुषार मुथा, कार्याध्यक्ष पवन लोढा आदी उपस्थित राहणार आहेत. पवित्र चातुर्मास महिन्यानिमित्त कोटा संघ प्रमुख प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब, प्रफुल्लाजीमहाराज, हंसाजीमहाराज, पुनितीजीमहाराज, गरिमाजीमहाराज, महिमाजीमहाराज यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रम सुरु आहेत.प्रतिभाकुंवरजीमहाराज यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी सकाळी नऊ वाजतापासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सुखलाल लोढा, मनोहरलाल लोढा, पवनकुमार लोढा, नितेशकुमार लोढा, पृथ्वीराज लोढा यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. या कार्यक्रमांना पुणे, नगर, नाशिक, सोलापूर, सातारा, रायगड, मुंबई येथूनही नागरिक उपस्थित राहणार आहेत, अशीही माहिती संमेलनाचे निमंत्रक नितीन बेदमुथा यांनी दिली आहे.संमेलनात अखिल भारतीय जैन सोशल आॅर्गनायझेशनचे देशभरातून पाचशे व राज्यातून दोनशे असे एकूण सातशे युवक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. उपस्थितांना संजय रावत (अहमदाबाद), राकेश जैन (इंदूर), कमल आचलिया (रायचूर) हे तज्ज्ञ सेवा, शिक्षा, संघटन; एक कदम गुरू दरबार की ओर; एक कदम जैनत्व की ओर; देशप्रेम भारतीय संस्कृती; उद्योग-धंद्यामध्ये प्रगती या विषयांवर मार्गदर्शन व्याख्यान देणार आहेत. तसेच या संमेलनात नवीन शाखा पदाधिकाऱ्यांचा शपथविधी, विशेष सेवाकार्य केलेल्या शाखांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड