शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
2
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
3
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
4
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
5
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
6
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
7
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
8
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
9
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
10
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
11
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
12
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
13
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
14
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
15
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
16
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
17
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
18
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
19
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
20
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना

पुण्याच्या कंपनीतील १३ लाखांच्या औषधांचा साठा जप्त, अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

By नारायण बडगुजर | Updated: October 8, 2025 22:33 IST

Pimpri News: राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने पुण्यात मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील एका कंपनीकडून उत्पादित केल्या जाणाऱ्या खोकल्यावरील औषधांचा १३ लाखांचा मोठा साठा जप्त केला. यात १९ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे औषध प्रशासनाने मंगळवारी (दि. ७ ऑक्टोबर) ही कारवाई केली.    

- नारायण बडगुजरपिंपरी - राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने पुण्यात मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील एका कंपनीकडून उत्पादित केल्या जाणाऱ्या खोकल्यावरील औषधांचा १३ लाखांचा मोठा साठा जप्त केला. यात १९ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे औषध प्रशासनाने मंगळवारी (दि. ७ ऑक्टोबर) ही कारवाई केली.

औषध प्रशासनाचे पुणे येथील सह आयुक्त गिरीश हुकरे यांनी याबाबत माहिती दिली. मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये खोकल्याच्या औषधाचे सेवन केल्याने बालके दगावल्याची घटना समोर आल्यानंतर राज्याचा अन्न व औषधे प्रशासन विभाग सतर्क झाला असून राज्यातील खोकल्यावरील औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची तपासणी केली जात आहे. त्याच बरोबर मेडिकल आणि सरकारी रुग्णालयातील खोकल्याच्या औषधांचे देखील नमुने घेतले जात आहेत. मध्यप्रदेशात ज्या औषधाच्या सेवनाने बालके दगावल्याचा संशय व्यत केला जात आहे त्या औषधाचा साठा महाराष्ट्र राज्यात नाही. मात्र, गुजरातमध्ये काही कंपन्यांमधील औषधांचे नमुने तपासण्या आले. त्यात काही घटक योग्य नसल्याचे समोर आले. त्यामुळे ही औषधे प्रतिबंधित करण्यात येत आहेत. त्यासाठी खबरदारी म्हणून औषधांच्या उत्पादक कंपन्यांमध्ये तपासणी केली जात आहे, असे हुकरे यांनी सांगितले.

नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तज्ज्ञ डाॅक्टरांनी लिहून दिलेली औषधे घ्यावीत. दोन वर्षांखालील लहान चिमुकल्यांना कोणत्याही प्रकारचे कफ सिरप दिले जाऊ नऊ, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.-गिरीश हुकरे, सह आयुक्त, औषध प्रशासन, पुणे

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmedicinesऔषधंFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग