शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

प्राधिकरणात होणार महापौर निवास - राहुल जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 01:24 IST

माजी महापौरांच्या अनुभवाचा, त्यांच्या विकासासंदर्भात सूचना व मार्गदर्शन घेण्यासाठी माजी महापौरांची बैठक महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्राधिकरणात महापौर निवास करण्यास गती देणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

पिंपरी : माजी महापौरांच्या अनुभवाचा, त्यांच्या विकासासंदर्भात सूचना व मार्गदर्शन घेण्यासाठी माजी महापौरांची बैठक महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्राधिकरणात महापौर निवास करण्यास गती देणार असल्याचे महापौरांनी सांगितले.माजी महापौर ज्ञानेश्वर लांडगे, रंगनाथ फुगे, कविचंद भाट, आर. एस. कुमार, संजोग वाघेरे, अनिता फरांदे, वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, नितीन काळजे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, डॉ.अनिल रॉय उपस्थित होते. माजी महापौरांच्या वतीने महापौर जाधव यांचा सत्कार केला.अनिता फरांदे म्हणाल्या, ‘‘महापालिकेतर्फे शहरात कॅन्सर रुग्णांसाठी हॉस्पिटल बांधावे. त्यासाठी दोन एकर जागा आरक्षित ठेवावी.’’वैशाली घोडेकर म्हणाल्या, ‘‘माजी महापौर संघटनेचे ज्येष्ठ महापौरांना अध्यक्ष करावे. महापालिका सभेत माजी महापौरांनी हात वर केल्यास बोलण्याची संधी द्यावी. ज्येष्ठ नागरिक महासंघास कार्यालयासाठी जागा, हॉॅल द्यावा.’’अपर्णा डोके म्हणाल्या, ‘‘सावित्रीबाई फुले स्मारकामध्ये महिलांचे प्रशिक्षण वर्ग सुरू करावेत. तेथे वाचनालय, स्पर्धा परीक्षा केंद्र, महिलांसाठी लघुउद्योग सुरू करावेत. शहरात सध्या डेंगी, स्वाइन फ्लूची साथ आहे. त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात.’’आर. एस. कुमार म्हणाले, ‘‘शहरास सध्याचा पाणीपुरवठा अपुरा आहे. भामा आसखेड- आंद्रा प्रकल्पाचे पाणी शहरात लवकर करावे. पवना बंद जलवाहिनीचे काम पूर्ण करावे.’’ज्ञानेश्वर लांडगे म्हणाले, ‘‘शहरात जनावरांसाठी दवाखाने सुरू करावेत.’’रंगनाथ फुगे म्हणाले, ‘‘निगडीपर्यंत मेट्रो करावी. मेट्रोला पिंपरी-चिंचवड मेट्रो नाव द्यावे. माजी महापौरांसाठी विमा सुरू करावा. मेट्रोशेजारी बीआरटी आहे. त्यामधून खासगी वाहने जातात. त्याला प्रतिबंध करावा. माजी महापौरांना निमंत्रणपत्रिका देण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमावा. पाच डायऱ्या द्याव्यात.’’बैठकीतील सूचनांचे पालन करू, असे महापौर जाधव यांनी सांगितले.कविचंद भाट म्हणाले, ‘‘महापालिकेच्या कार्यक्रमांना माजी महापौरांना निमंत्रित करावे. एका प्रतिनिधीला स्टेजवर बसवावे. तसेच पहिल्या रांगेत माजी महापौरांसाठी जागा राखीव ठेवावी. माजी महापौरांची संघटना तयार करावी. त्यांच्यासाठी महापालिकेत जागा मिळावी. दोन महिन्यांनी बैठक घ्यावी. माजी महापौरांच्या निवासस्थानाचे फलक लावावेत.’’प्राधिकरणात कॅन्सर हॉस्पिटलसाठी जागा उपलब्ध करुन दिली होती. परंतु तेथे कोणतीही संस्था पुढे आली नाही. वेतन कमी असल्याने महापालिकेत डॉक्टर उपलब्ध होत नाहीत. चिखलीत मोठे हॉस्पिटल बांधण्यात येईल. तेथे १०० बेडचे आरक्षण कॅन्सर रुग्णांसाठी ठेवण्यात येईल.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMayorमहापौरnewsबातम्या