शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाणी प्रश्नावरून महापौर भडकले, पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास कारवाई करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 01:14 IST

च-होली-मोशी हा पिंपरी-चिंचवडच्या महापौर नितीन काळजे यांचा प्रभाग. गेल्या महिनाभरापासून या प्रभागात दूषित आणि अनियमितपणे पाणीपुरठा सुरू आहे, याबाबत महापौरांनी अधिका-यांकडे तक्रार करूनही प्रश्न सुटलेला नाही. म्हणून आज महापौर पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांवर भडकले.

पिंपरी : च-होली-मोशी हा पिंपरी-चिंचवडच्या महापौर नितीन काळजे यांचा प्रभाग. गेल्या महिनाभरापासून या प्रभागात दूषित आणि अनियमितपणे पाणीपुरठा सुरू आहे, याबाबत महापौरांनी अधिका-यांकडे तक्रार करूनही प्रश्न सुटलेला नाही. म्हणून आज महापौर पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांवर भडकले. दोन दिवसांत पाणीप्रश्न सुटला नाही, तर तुमच्यावर कारवाई करावी लागेल, असा इशाराही दिला.पिंपरी-चिंचवड शहराला मावळ परिसरातील पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे दिवसाआड सुरू असणारा पाणीपुरवठा नियमित करण्यात आला. समाधानकारक पाणीसाठा असूनही शहरातील विविध भागांत पिण्याचे पाणी कमी दाबाने येणे, अपुरा पाणीपुरवठा होणे, दूषित पाणी येणे अशा तक्रारी येत आहेत. मात्र, महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे. याबाबत महापौर नितीन काळजे यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र, तक्रारींचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे महापौरांच्या निदर्शनास आले आहे.महापौर काळजे म्हणाले, ‘‘च-होली गावठाण परिसर, आझादनगर, काळी भिंत परिसर, दाभाडेवस्ती, पद्मावतीनगरी येथपासून बुरडेवस्तीपर्यंतच्या भागात दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून पाणी दूषितच येत आहे. अधिकारी येतात, पाहणी करून जातात.दोन दिवसांत हा प्रश्न सुटायला हवा. बुधवारी सकाळी अधिका-यांनी या भागाची पाहणी करून दूषित पाणी कोठून येते, याचा शोध घ्यावा. त्यावर उपाययोजना कराव्यात. प्रश्न न सुटल्यास संबंधित अधिका-यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. शहरातील विविध भागांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. त्याबाबत तक्रारी आहेत. नागरिकांच्या तक्रारी सोडविणे गरजेचे आहे. त्याबाबत कोणाचीही गय केली जाणार नाही.’’>महापौर दालनात बैठक : गढूळ पाणीपुरवठापाणीपुरवठा विभागाकडून दूषित पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडविला जात नसल्याचा अनुभव महापौरांना आला. महिनाभरापासून च-होली-मोशी प्रभागात दूषित आणि अपुरा पाणीपुरवठा होत आहे. याबाबत स्वत: लक्ष घालून महापौरांनी प्रशासनास सूचनाही केल्या. मात्र, प्रश्न न सुटल्याने महापौरांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांना मंगळवारी सायंकाळी कार्यालयात बोलावून घेतले. प्रश्न सुटत नसल्याने ते अधिका-यांवर भडकले. महापौरांच्या प्रभागातील पाण्याचा प्रश्न सुटत नसेल, तर इतर प्रभागांचे काय? हे खपवून घेतले जाणार नाही, असे सुनावले.