शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

मावळ लोकसभा निवडणूक निकाल रात्री उशिरापर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 14:29 IST

युतीचे खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार अशी दुरंगी लढत आहे.

ठळक मुद्देमावळ मतदारसंघातील मतमोजणी बालेवाडी क्रीडासंकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये होणारएकाच वेळी मतदान केंद्रांची मतमोजणी झाल्यानंतर फेरीनिहाय निकाल जाहीर करण्यात येणार मतमोजणीवेळी अधिकृत प्राधिकार पत्र किंवा निवडणूक ओळखपत्र असलेल्या व्यक्तींनाच प्रवेशमावळ लोकसभा निवडणूक मतदानाची सर्व तयारी पूर्ण

पिंपरी : मावळ लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी होणार असून, प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. प्रथमच प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटच्या मतपत्रिकांची मोजणी केली जाणार असल्याने अंतिम निकाल येण्यासाठी सुमारे १५ तासांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे मावळ लोकसभेचा अंतिम निकाल मिळण्यास रात्र उजाडणार आहे. मावळ मतदारसंघातील मतमोजणी बालेवाडी क्रीडासंकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी मनुष्यबळासह व्यवस्थेसंदर्भात नियोजन केले आहे. या ठिकाणी विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी होणार आहे. एकाच वेळी मतदान केंद्रांची मतमोजणी झाल्यानंतर फेरीनिहाय निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. मतमोजणीचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. मतमोजणीवेळी अधिकृत प्राधिकार पत्र किंवा निवडणूक ओळखपत्र असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असेल.

निकालापूर्वीच चर्चा रंगल्यामावळ लोकसभा मतदारसंघात रिंगणात एकूण २१ उमेदवार होते. युतीचे खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार अशी दुरंगी लढत आहे. लोकसभा मतदारसंघात यंदा ५९.४९ टक्के मतदान झाले आहे. मतदानाचा शेवटचा टप्पा झाल्यानंतर एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. त्यात मावळची जागा काही ठिकाणी युतीला आणि आघाडीलाही जाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे युती आणि आघाडीच्या समर्थकांमध्ये चुरशीची लढत आहे. 

अशी होणार मतमोजणी...गुरुवारी सकाळी आठला इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम मते बारकोडद्वारे मोजली जाणार आहेत. पोस्टल मतांची गणना होईल. त्यानंतर एका फेरीस ४५ मिनिटांचा कालावधी लागणार आहे. ईव्हीएमची मते मोजण्यास अधिक कालावधी लागला, तरी काही वेळाने ३५ मिनिटांमध्ये एक फेरी पूर्ण होईल. एका विधानसभा मतदारसंघाकरिता किमान १४ टेबल लावले आहेत. २९ फेºयांपर्यंत मोजणी होणार असल्याने निकाल येण्यासाठी १४ ते १५ तास लागणार आहेत. २५०४ ईव्हीएमच्या मतमोजणीसाठी किमान दहा तास व त्यानंतर व्हीव्हीपॅटसाठी चार तास लागतील, असा अंदाज आहे. मतमोजणीचा अंतिम निकाल देण्यास रात्रीचे दहा ते अकरा वाजण्याची शक्यता आहे. 

* तीन निरीक्षकांची नेमणूकनिवडणूक आयोगाने या वेळी तीन निवडणूक निरीक्षक नेमले आहेत. २ विधानसभा मतदारसंघांमागे एक असे सहा मतदारसंघासाठी तीन निरीक्षक आहेत. तीनही निरीक्षक सोमवारी सायंकाळी शहरात आले असून, त्यांनी स्ट्राँग रूमसह मतदान मोजणी केंद्राचा आढावा घेतला आहे. ....* मावळ लोकसभा निवडणूक मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. बालेवाडी येथे मतमोजणीची रंगीत तालीम बुधवारी (दि. २२) घेण्यात येणार आहे. प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाली आहे. कामांचे वाटप केल्यानुसार आढावा घेण्यात येत आहे.- कविता द्विवेदी, निवडणूक निर्णय अधिकार...............

विधानसभा    मतदान केंद्र संख्या     झालेले मतदान     फेºया    चिंचवड     ४७०     २,८३,००४     २४    पिंपरी     ३९९    १,८९,४०४     २९    मावळ     ३६९     २,११,३८३     २७    पनवेल     ५८४     २,९८,३४९     २५    कर्जत     ३४३     १,८९,५७७     २५    उरण     ३३९      १,९५,१०१     २५ 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडVotingमतदानLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालmaval-pcमावळ