शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनांबाबत जनजागृती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:28 IST

विकास चोधे : आकुर्डीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

रावेत : विद्यार्थ्यांनी व्यसनाच्या आहारी न जाता आपल्या आजुबाजूला असणाऱ्या लोकांना आपल्या मित्र-मैत्रिणींना व्यसनापासून दूर राहण्यासाठी मदत करावी. व्यसनांमुळे होणारे दुष्परिणाम जाणून घ्या. समाजाला त्याबाबत माहिती देऊन व्यापक जनजागृती करण्याची गरज आहे, असे मत डॉ. विकास चोधे यांनी व्यक्त केले.

आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने चिंचवड येथील डॉन बॉस्को सोसायटीच्या सहकार्याने डॉ. चोधे यांचे ‘व्यसनमुक्ती’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. सोसायटीच्या समन्वयक ललिता चौधरी, विभावरी कांबळे, राजश्री देशखिरे, सारिका कदम, अर्जुन शरणागते, उपप्राचार्य डॉ. नीलेश दांगट आदी या वेळी उपस्थित होते.महाविद्यालयामध्ये व्यसनमुक्तीवर पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. रविराज काळे, सोमेश्वर कारळे, विद्या धुरटे या विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिकबंदी, व्यसनमुक्ती या विषयावरील पथनाट्य सादर केले. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. प्राचार्य डॉ. मनोहर चासकर यांनी मार्गदर्शन केले. डॉ. सविता कुलकर्णी, डॉ. सारिका मोहोळ यांनी नियोजन केले. मनोज गुंजाळ, रविराज काळे, विजय बनसोडे या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. डॉ. दांगट यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सविता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सारिका मोहोळ यांनी आभार मानले.काही वेळा लहानपणापासून दारू, तंबाखूची सवय लागते. अशा वेळी व्यसनापासून दूर राहणे अवघड असते. आई-वडिलांनी पाल्याकडे लक्ष द्यावे. अनेकदा मित्रांमुळे आपल्याला अशा सवयी लागतात. तेव्हा अशा मित्रांची संगत सोडावी. सिगरेट पिणाºया व्यक्तीच्या शरीरात ३० टक्के धूर जातो. उर्वरित धूर आजुबाजूला असणाºया लोकांना त्रासदायक असतो. व्यसनाधीनतेमुळे मानसिक असंतुलन, नैराश्य, आत्महत्या घडतात. आपल्या हातून काय घडते आहे याचा अंदाज व्यसनाधीन माणसाला नसतो. विद्यार्थ्यांनी आपल्या आजुबाजूला व्यसन करणारी व्यक्ती असल्यास तिला त्याचे दुष्परिणाम सांगावेत, असे आवाहन डॉ. चोधे यांनी केले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडliquor banदारूबंदी