शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
3
आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
4
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
5
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
6
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
8
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
9
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
10
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
11
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
12
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
13
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
15
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
16
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
17
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
18
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
19
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
20
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट

मिळणारे अनुदान कायम ठेवावे

By admin | Updated: January 6, 2016 00:31 IST

राज्य सरकारकडून महापालिकेला दिल्या जाणाऱ्या अनुदानात कपात न करता ते कायम ठेवावे, अशी मागणी राज्य सरकारकडे केली असल्याची माहिती आयुक्त जाधव यांनी सोमवारी दिली.

पिंपरी : राज्य सरकारकडून महापालिकेला दिल्या जाणाऱ्या अनुदानात कपात न करता ते कायम ठेवावे, अशी मागणी राज्य सरकारकडे केली असल्याची माहिती आयुक्त जाधव यांनी सोमवारी दिली. याबाबत ‘लोकमत’ने रविवारी (दि. ३०) ‘तेल गेले तुपही गेले, हाती धोपाटणे’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यात अनुदानात घट झाल्याने महापालिकेच्या उत्पन्नावर झालेल्या परिणामाचा ऊहापोह केला होता. त्याची दखल घेऊन आयुक्तांनी राज्य शासनाकडे अनुदान कायम ठेवण्याची मागणी केली आहे.एलबीटीच्या बदल्यात राज्य सरकारकडून महापालिकेला देण्यात येणाऱ्या अनुदानात १९ कोटी रुपयांनी कपात केली आहे. त्यामुळे दरमहा महापालिकेला मिळणारे ६६ कोटींचे अनुदान आता ४७ कोटींवर आले आहे. यासह इतर करांच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातही घट होत असून, यामुळे महापालिकेच्या विकासकामांवर परिणाम होणार आहे. याबाबत आयुक्तांना विचारले असता ते म्हणाले, अनुदान कपात होऊ नये यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. यासह अनधिकृत बांधकामांवरील कारवाईतही कोणाचाही दबाव खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिकाही आयुक्तांनी स्पष्ट केली. सद्य:स्थितीत महापालिकेच्या विविध भागांतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू आहे. अहवाल तयार केला जातो. याबाबतची माहिती उच्च न्यायालयाला दिली जाते. कोणाचाही दबाव खपवून घेतला जाणार नसल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)