शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

संरक्षण सामग्री निर्मितीत महाराष्ट्र अग्रणी : देवेंद्र फडणवीस

By प्रकाश गायकर | Updated: February 24, 2024 20:27 IST

‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो २०२४’ चे उदघाटन : महाप्रदर्शनात डिफेन्स एम एस एम ई कंपन्यांचा सहभाग

प्रकाश गायकर, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी : पुणे येथे संरक्षण सामग्री निर्मितीची चांगली परिसंस्था निर्माण झाली आहे. या क्षेत्रात महाराष्ट्र अग्रणी आहे. अनेक संरक्षण विषयक संस्था राज्यात आहेत. तीस टक्के दारुगोळा महाराष्ट्रात तयार होतो. सन २०१७ साली एअरोस्पेस, डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले. त्यामुळे महाराष्ट्राचा देशात मान वाढला आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो २०२४’चे आयोजन शनिवार (दि.२४) ते सोमवार (दि. २६) दरम्यान महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागाकडून पिंपरी चिंचवड येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन सेंटर (मोशी) येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (दि.२४) झाले. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, डॉ. बिपीन शर्मा, लेफ्टनंट जनरल अजयकुमार सिंग, एयर मार्शल विभास पांडे, ‘निबे लिमिटेड’चे अध्यक्ष आणि प्रदर्शनाचे नॉलेज पार्टनर गणेश निबे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप तसेच संरक्षण दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. डिफेन्स एमएसएमई क्षेत्रातील मॅक्स एरोस्पेस, निबे लिमिटेड या कंपन्यांनी यावेळी महाराष्ट्र सरकारशी निर्मितीसंदर्भात करार केले. 

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची ताकद ओळखली. स्वतःची संरक्षण सामग्री स्वतः देशात निर्माण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हा देश मजबूत देश म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. भारताला आता तंत्रज्ञान दिले जाऊ लागले आहे. लाखो कोटींची बचत होऊन रोजगार निर्मिती झाली आहे. एमएसएमई क्षेत्रानेही चांगले काम करून दाखवले. सप्लाय चेनवर भर देऊन चार डिफेन्स क्लस्टर तयार केले जाणार आहेत. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होईल आणि रोजगार निर्मिती होणार आहे.”  

डॉ. हर्षदीप कांबळे यांनी प्रास्ताविक केले. ‘निबे लिमिटेड’चे अध्यक्ष आणि प्रदर्शनाचे नॉलेज पार्टनर गणेश निबे यांनी आभार मानले. मानसी सोनटक्के यांनी सूत्रसंचालन केले.

राज्यात चार ठिकाणी डिफेन्स हब : सामंत 

उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, “राज्यात चार ठिकाणी डिफेन्स हब निर्माण करण्यात येणार आहे. या उद्योगांच्या मागणीनुसार एक हजार एकर जागा त्यांना देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली निर्णय घेण्यात आला आहे. या उद्योगांना प्राधान्य आणि इन्सेन्टिव्ह मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. डिफेन्स एमएसएमई क्षेत्रातील निबे लिमिटेड या कंपन्यांनी घेतलेल्या पुढाकाराने हे महाप्रदर्शन प्रत्यक्षात आले आहे.”--

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस