शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : पिंपरीत निवडणुकीच्या प्रचारासाठी ‘रात्र थोडी, सोंगे फार’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 15:34 IST

दारोदार फिरून जनमत आपल्या बाजूने करण्यासाठी उमेदवारांना अवघे दहा दिवस आहेत.

ठळक मुद्देआयोगाने दिलेल्या २८ लाख रुपये खर्चाच्या मर्यादेत राहून प्रचार करताना तारेवरची कसरत उमेदवार पिंजून काढताहेत गावे

पिंपरी : विधानसभेची रणधुमाळी चांगलीच रंगात आली आहे.  उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप झाल्यानंतर, प्रचारसाहित्य तयारीला वेग आला आहे. दारोदार फिरून जनमत आपल्या बाजूने करण्यासाठी उमेदवारांना अवघे दहा दिवस आहेत. अशा स्थितीमध्ये रात्रीचा दिवस करून, उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचताना दमछाक होत आहे. शहरामध्ये तीन मतदारसंघ आहेत; तसेच मावळ हा ग्रामीण मतदारसंघही आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये निवडणूक आयोगाचे दोन-दोन निवडणूक निरीक्षक सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. याशिवाय प्रचार यंत्रणेवरील खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र निरीक्षक आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या प्रचारावरही बºयाच मर्यादा आहेत. आयोगाने दिलेल्या २८ लाख रुपये खर्चाच्या मर्यादेत राहून प्रचार करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या वेळी बहुतांश पक्षांच्या उमेदवारांना तिकीट आपल्याला मिळेल की नाही, याची शाश्वती नव्हती. त्यामुळे बरेच उमेदवार पक्षश्रेष्ठींना साकडे घालण्यासाठी राजधानीचे दौरे करण्यात व्यस्त होते. त्यामुळे मतदारसंघाचा संपर्क बऱ्यापैकी तुटला होता. तिकीट मिळाल्यानंतरही अनेक राजकीय घडामोडी घडत होत्या. अशा स्थितीत कमी वेळेमध्ये मतदारापर्यंत पोहोचणे हे उमेदवारांपुढे आव्हान आहे. निवडणुकीसाठी १० दिवस शिल्लक आहेत. १९ आॅक्टोबर ही प्रचाराची शेवटची तारीख आहे. तत्पूर्वीच उमेदवाराला प्रत्येक वॉर्डातील मतदारापर्यंत पोहोचायचे ..............उमेदवार पिंजून काढताहेत गावेमावळात २२० गावे आहेत. प्रचारासाठी थोडा कालावधी असल्याने मावळातील उमेदवारांनी गावभेटीवर धडाका लावला आहे. सभा, बैठकांचे आयोजन केले जात आहे. ग्रामपंचायतीच्या कट्ट्यावर उमेदवारांच्या बैठका होत आहेत. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी झाडून कामाला लागले आहेत. प्रचारासाठी कमी कालावधी असल्याने एकाच दिवशी दहा-पंधरा गावे पिंजून काढली जात आहेत. नगरसेवकांची धावपळशहरातील तीन मतदारसंघांमध्ये ३२ प्रभाग आहेत. या प्रभागातील नगरसेवक कंबर कसून निवडणुकीच्या प्रचारामध्ये उतरले आहेत. सोसायट्यांमध्ये सभा घेणे, महिला संघांच्या भेटी घेणे यासाठी नगरसेवक प्लॅनिंग करत आहेत. मात्र प्रचारासाठी थोडे दिवस बाकी असताना प्रत्येक प्रभागामध्ये उमेदवारांचा दौरा आयोजित करताना नगरसेवकांची पळापळ होत आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडElectionनिवडणूकPoliticsराजकारण