शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra election 2019 : पिंपरीत युतीसह आघाडीत बंडखोरी ठरणार डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 18:53 IST

'' बंडोबां''च्या भूमिकेकडे लक्ष्य...

ठळक मुद्देसात उमेदवारांकडून १३ अर्ज दाखल पिंपरी मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार

पिंपरी : राखीव असलेल्या पिंपरी मतदारसंघात महायुतीसह महाआघाडीच्या बंडखोरांनी गुरुवारी (दि. ३) उमेदवारी अर्ज दाखल केले. रॅली काढून शक्तिप्रदर्शन करीत निगडी प्राधिकरणातील हेडगेवार भवन येथे गुरुवारपर्यंत सात उमेदवारांनी १३ नामनिर्देशन पत्र दाखल केले. शेवटच्या दिवशी शुक्रवारी (दि. ४) आणखी काही नाराजांकडून अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. असे असले तरी अर्ज माघारीनंतरच या मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट होईल.महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्याकडूनही पिंपरीच्या जागेची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून ह्यशब्दह्ण घेण्यात आला होता. तसेच भाजपाकडूनही इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यास प्रतिसादही मिळाला. मात्र विद्यमान आमदार शिवसेनेचा असल्याने ही जागा शिवसेनेकडे गेली. त्यामुळे आरपीआय तसेच भाजपातील इच्छुकांचा हिरमोड झाला. जोरदार तयारी केली असताना तसेच ''शब्द'' दिला असतानाही जागा सोडण्यात आली नाही म्हणून इच्छुकांनी नाराजी व्यक्त करीत बंडाचे निशाण फडकावले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा भाजपा प्रदेश कार्यकारिणी समितीचे सदस्य अमित गोरखे भाजपाकडून इच्छुक होते. त्यांनीही भाजपाकडून तसेच अपक्ष म्हणूनही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे यांनीही अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. महाआघाडीत ही जागा राष्ट्रवादीला मिळाली आहे. असे असतानाही काँग्रेसकडून इच्छुक असलेले सुंदर कांबळे यांनी अपक्ष तसेच काँग्रेसचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. त्यामुळे आघाडीतही बंडाळी झाल्याचे दिसून आले. शिवसेनेतर्फे विद्यमान आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. विजय हनुमंत रंदिल यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. 

'' बंडोबां''च्या भूमिकेकडे लक्ष्यपिंपरी मतदारसंघात इच्छुकांची मोठी संख्या आहे. पक्षश्रेष्ठी तसेच नेत्यांकडून मनधरणी करण्यात येऊन त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. असे असले तरी काही उमेदवार बंडखोरी करीत निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे दिसून येते. शनिवारी (दि. ५) उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून, सोमवारी (दि. ७) उमेदवारी अर्ज माघार घेता येणार आहेत. त्यानंतरच पिंपरी मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार असून, बंडखोर नेमकी काय भूमिका घेतात, याकडे शहरवासीयांचे लक्ष्य लागून आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडElectionनिवडणूकPoliticsराजकारण