शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Elecion 2019 : शरद पवारांची अवस्था ‘शोले’तील जेलर सारखी : मुख्यमंत्र्यांकडून बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 14:29 IST

काँग्रेसचे राहुल गांधी बँकॉकला फिरायला गेले आहेत आणि इकडे शरद पवार यांची अवस्था ‘शोले’ सिनेमातील ‘जेलर’ सारखी झाली आहे. ‘

ठळक मुद्देमहायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची गुरुवारी रहाटणी येथे सभा

पिंपरी : विधानसभा निवडणूक कोणाविरोधात लढायची हेच कळत नाही. आमचे पहिलवान निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, पण पुढे कोणीच नाही. काँग्रेसचे राहुल गांधी बँकॉकला फिरायला गेले आहेत आणि इकडे शरद पवार यांची अवस्था ‘शोले’ सिनेमातील ‘जेलर’ सारखी झाली आहे. ‘आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे साथ आओ’ प्रत्यक्षात मात्र त्यांच्यामागे कोणीच नाही, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली. 

पिंपरी-चिंचवड येथील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची सभा रहाटणी येथे गुरुवारी  झाली. या वेळी राज्यमंत्री बाळा भेगडे, महापौर राहुल जाधव, अमित गोरखे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे व गौतम चाबुकस्वार आदी उपस्थित होते.  ‘‘सुशीलकुमार शिंदे हे द्रष्टे नेते आहेत. त्यांना निवडणुकीनंतर काय होणार हे कळले आहे. म्हणूनच त्यांनी सोलापूरमध्ये आम्ही थकलो आहे. आमच्याने काही होणार नसल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी विलीनीकरणाची भाषा त्यांनी केली. काँग्रेस आघाडीची अवस्था अशी बिकट झाली आहे की, त्यांना विरोधी पक्षनेताही निवडता येणार नाही. त्यासाठी लागणाऱ्या १० टक्के जागाही निवडून येणार नसल्याची खात्री सुशीलकुमार शिंदे यांना पटल्यानेच त्यांनी विलीनीकरणाची भाषा सुरू केली आहे, असा टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी मारला. ......

बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीच्या घड्याळाचे वाजले बारा४चिंचवड व भोसरी मतदारसंघात राष्ट्रवादीला घड्याळावर निवडणूक लढविण्यासाठी उमेदवार मिळाला नाही. त्यामुळे बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीच्या घड्याळाचे बारा वाजले आहेत. आमचे दोन पहिलवान रिंगणात उतरले आहेत. मात्र, समोर कोणताच उमेदवार दिसत नाही, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.   

रेकॉर्ड ब्रेक मताने निवडून द्या, नाहीतर हिशेब द्यावा लागेलमी उमेदवार निवडून द्या, असे सांगायला आलो नाही. उमेदवार निवडून येणारच आहेत. तुम्हाला विचारायला आलोय की, रॅकॉर्ड ब्रेक मताने निवडून द्या, नाहीतर तुम्हाला हिशेब द्यावा लागेल, असा इशारा मतदारांना देत, मला माहिती आहे, तुम्ही महायुतीचे उमेदवार रेकॉर्ड ब्रेक मताने निवडून द्याल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी मेळाव्यात व्यक्त केला. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliticsराजकारणSharad Pawarशरद पवारRahul Gandhiराहुल गांधीElectionनिवडणूकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस