शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कळस चोरीविरोधात कार्ला फाट्यावर महाआरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 01:41 IST

नीलम गोऱ्हे : कमिटीला बदनाम करण्यासाठीच चोरीचा प्रकार

लोणावळा : एकवीरा देवीच्या मंदिराचा कळस चोरणारे चोर हाती लागले असतानादेखील त्यांना समोर आणले जात नाही, असा घणाघाती आरोप शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गोºहे यांनी तपास यंत्रणेवर केला आहे. कार्ला गडावरील एकवीरा देवीच्या कळसचोरीच्या घटनेला वर्ष झाले, तरी कळस व कळसचोर न सापडल्याच्या निषेधार्थ कार्ला फाटा या ठिकाणी भाविकांच्या वतीने आज महाआरती करण्यात आली.

त्यावेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘कळस चोरांच्या हेतूविषयी शंका असून, मंदिर कमिटीला बदनाम करण्यासाठी ही चोरी झाली आहे. या घटनेचा तपास करणारे अधिकारी यांच्याकडे सीसीटीव्ही फुटेज व पुरावे असतानादेखील चोरांना समोर आणले जात नाही. देवीची वक्रदृष्टी पडण्यापूर्वी चोरांना समोर आणा, जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांची वाट पाहू नका.’’ अनंत तरे म्हणाले, की कार्ला गडावर देवीच्या कळस चोरीचे कटकारस्थान काही ग्रामस्थ व गावगुंडांनी केले आहे. तातडीने कळस व कळसचोर न सापडल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी या वेळी दिला. तसेच वन विभागाच्या जागेवर असलेले पायथा मंदिर शासनाने ताब्यात घ्यावे व देवीच्या पैशांची सुरू असलेली लूट थांबवावी, अशी मागणी केली. यावेळी श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व माजी आमदार अनंत तरे, शिवसेनेचे माजी पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, खासदार सुरेश टावरे, माजी आमदार प्रकाश भोईर, माजी नगरसेवक अर्जुन भोईर, देवस्थानचे उपाध्यक्ष मदन भोई, खजिनदार नवनाथ देशमुख, विलास कुटे हे मान्यवर उपस्थित होते. आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये याकरिता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.चोरीचा तपास सीआयडीकडे द्यामहाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील एकवीरा देवी मंदिर कळस चोरीचा तपास सीआयडीकडे आहे. या प्रकरणातील कळसचोर सापडले असतानादेखील ते समोर आणले जात नसल्याने याप्रकरणी सीआयडीचे महासंचालक यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार असल्याचे शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘एक महिन्यात चोर समोर न आणल्यास येत्या अधिवेशनात याविरोधात आवाज उठविण्यात येईल.’’ आया-बहिणींची सुरक्षा कोण करणार?

लाखो भाविकांचे रक्षण करणाऱ्या देवीच्या मंदिराचा कळस चोरी होऊन ती उघडकीस येत नसेल, तर या राज्यातील आया-बहिणींची सुरक्षा कोण करणार, असा प्रश्न उपस्थित करीत नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांनी या घटनेकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडNeelam gorheनीलम गो-हे