शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

‘वायसीएम’मध्येही रूग्णांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 23:56 IST

गरिबांना जीवन देणारे रुग्णालय म्हणून पिंपरी-चिंचवड शहरातील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आहे. मात्र, या रुग्णालयातील रुग्णसेवेकडे महापालिकेचे सत्ताधारी भाजपा आणि प्रशासनाचे लक्ष नसल्याचे ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करून उघडकीस आणले आहे.

विश्वास मोरे ।पिंपरी : गरिबांना जीवन देणारे रुग्णालय म्हणून पिंपरी-चिंचवड शहरातील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आहे. मात्र, या रुग्णालयातील रुग्णसेवेकडे महापालिकेचे सत्ताधारी भाजपा आणि प्रशासनाचे लक्ष नसल्याचे ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करून उघडकीस आणले आहे. शिकाऊ डॉक्टरांचा भरणा, प्रशासकीय यंत्रणा नियोजन आणि अंमलबजावणीचा अभाव, जबाबदार व्यक्त तातडीक विभागात नसणे, रुग्णांना बाहेरून औषध आणायला लावणे, तसेच गोळ्या देण्याच्या नावाखाली रुग्णांच्या नातेवाइकांची ‘आर्थिक’ लूट केली जात आहे. त्यामुळे या रुग्णालयाचे आॅपरेशन करण्याची वेळ आली आहे.संत तुकारामनगरातील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील तातडीक (कॅज्युलिटी) विभाग. दुपारी पावणेचारची वेळ. वाल्हेकरवाडी, चिंचवड परिसरातील एक सर्वसामान्य कुटुंबातील ४५ वर्षीय महिला पोटात दुखते म्हणून रुग्णालयात दाखल होते. वेदनांनी अत्यंत हैराण झालेली ही स्त्री तातडीक विभागात गेल्यानंतर सीएमओ आॅफिसशेजारील वैद्यकीय अधिका-याचे केबिन मोकळेच होते. (अर्थात अधिकारी गायब). सीएमओ कार्यालयात एक डॉक्टर होते. तोंडाला मास्क लावलेले हे डॉक्टर तीस ते पस्तीस या वयोगटातील. या वेळी रुग्णास खूप वेदना होत आहेत, असे रुग्णाला बरोबर घेऊन येणाºयांनी डॉक्टरांना सांगितल्यानंतर तेथील डॉक्टरने केसपेपर काढण्याची चिठ्ठी लिहून दिली. त्यानंतर तातडीने प्रवेशद्वारासमोरील काउन्टरवरून केसपेपर काढला. त्यासाठी तेथील काउंटरवरील क्लार्कने ५०० रुपयांची नोट देऊनही नियमानुसार १० रुपये शुल्क घेतले. तेथून पुन्हा तातडीक विभागात आल्यानंतर त्याच डॉक्टरांनी आपणास पेशंटला एक इंजेक्शन द्यावे लागेल. ते तातडीने घेऊन या, असे सांगितले. ‘हे इंजेक्शन आपल्याकडे नाही का?’ असे विचारल्यावर ‘नाही, बाहेरूनच आणावे लागेल असे सांगितल्यानंतर तेथून पोलीस चौकी आणि लिफ्टशेजारील कर्मचारी महासंघाच्या मेडिकलमध्ये चिठ्ठी घेऊन गेल्यानंतर इंजेक्शन दिले. दहा रुपये घेतले. त्यावर पावती द्या, अशी मागणी तेथील व्यक्तीला केली. आता पावती मिळणार नाही, नंतर या. इंजेक्शन घेऊन पुन्हा तातडीक विभागात गेल्यानंतर डॉक्टरने इंजेक्शन दिले. गोळ्या घेऊन या असे केसपेपरवर लिहून दिले. रुग्णालयाच्या मेडिकलमधून गोळ्या घेतल्या. तेथेही नियमानुसारच दहा रुपये शुल्क घेतले. पुन्हा तातडीक विभागात आल्यानंतर संबंधित रुग्णाच्या वेदना काही कमी होत नव्हत्या. त्या वेळी संबंधित डॉक्टर म्हणाले, ‘‘आणखी एक इंजेक्शन बाहेरून आणावे लागेल व चिठ्ठी लिहून दिली. त्यानंतर पुन्हा महासंघाच्या मेडिकलमध्ये गेल्यानंतर ५६ रुपये घेतले. ते तीन इंजेक्शन होते. पुन्हा पावती दिली नाही. तीनपैकी एकच इंजेक्शन फोडून पेशंटला दिले गेले. तरीही रुग्णाच्या वेदना कमी होत नव्हत्या. त्यानंतर डॉक्टरांनी गोळ्यांचे एक पाकीट दिले. रुग्णाबरोबर आलेल्यांना वाटले ते फुकट असेन. मात्र, गोळ्या दिल्यानंतर डॉक्टर रुग्णाच्या अवतीभवतीच फिरत होते. काही वेळाने रुग्णाजवळ आले आणि म्हणाले, त्या गोळ्यांचे १०० रुपये द्यावे लागतील.’ अडला हरी म्हणून रुग्णासोबत असलेल्यांनी डॉक्टरांना १०० रुपये दिले. त्यानंतर गोळ्या, इंजेक्शन घेतल्या. दरम्यान, अपघाताचा एक रुग्ण दाखल झाल्याने डॉक्टर त्या रुग्णाला तपासण्यासाठी गेले. त्यानंतर सुमारे अर्धा तास रुग्णास बरे वाटेना, म्हणून सीएमओ कार्यालयासमोरच असणा-या स्पेशल वॉर्डात नेले. (ओळख सांगितल्यानंतर सूत्रे हलली) तेथील डॉक्टरांनी तपासले. मेडिकल हिस्ट्री लिहून घेतली. त्यानंतर एक्स रे, पोटाची सोनोग्राफी केली.तीन आठवड्यांपूर्वीच महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी अचानकपणे भेट देऊन वायसीएम रुग्णालयाची पाहणी करून स्टिंग आॅपरेशन केले होते. वायसीएमचा कारभार बेभरोसे असल्याचे आढळून आले होते. रुग्णांशी भेटून डॉक्टर, कर्मचारी यांच्याशी संवाद साधला होता.रुग्णांची हेळसांड, डॉक्टर-कर्मचा-यांची कमतरता असल्याचे आढळून आले होते. उपचाराचे आश्वासन दिले होते. मात्र, याबाबत आयुक्तांशी होणा-या बैठकीला अजूनही वेळ सापडलेली नाही. सत्ताधारी व प्रशासनाने गांभीर्याने विचार करून आॅपरेशन करण्याची गरज आहे. तरच रुग्णांवर चांगले उपचार होतील.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल