शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळा ते तिकोना दरम्यान टाटा अल्ट्रा मॅरेथॉन संपन्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 20:04 IST

लोणावळा येथून रविवारी पहाटे 2.30 वाजता 50 किमी अंतराची व 4.30 वाजता 35 किमी अंतराची स्पर्धा सुरु झाली.स्पर्धे दरम्यान धावपटूंकरिता 20 ठिकाणी पाण्याचे थांबे, मेडिकल टिम, टेक्निकल टिम तैनात करण्यात आली होती.

ठळक मुद्देदेशपातळीवरील टाटा अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत किशोर गव्हाणे व नुपूर सिंग प्रथमलोणावळा येथून रविवारी पहाटे स्पर्धा सुरु

लोणावळा : जागतिक पातळीवरील अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत पात्रता फेरीच्या क्वालिफिकेशन लाईन सरावाकरिता  लोणावळा ते तिकोना दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या देश पातळीवरील टाटा अल्ट्रा ह्या 50 व 35 किलोमिटरच्या मॅरेथॉन (धावण्याच्या) स्पर्धेत किशोर गव्हाणे या स्पर्धकाने अवघ्या 3 तास 20 मिनिटे व 37 सेकंदात 50 किलोमिटरचे अंतर पुर्ण करत भारतातील सर्वात जलद अल्ट्रा धावपटू होण्याचा मान मिळविला. 

मागील वर्षी हे अंतर 3 तास 40 सेकंदामध्ये पार करण्यात आले होते. महिला स्पर्धकांमधील नुपुर सिंग यांनी 4 तास 15 मिनिटे व 17 सेकंदामध्ये 50 किलोमिटरचे अंतर पार करत महिलांमध्ये प्रथम येण्याचा मान मिळविला. जागतिक पात्रता पातळीत बसणारे 1400 धावपटू या अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये 200 महिला स्पर्धकांचा सहभाग होता. मागील वर्षी झालेल्या एशिया अल्ट्रा रन मधील सर्व भारतीय धावपटू तसेच आर्मीचे स्पर्धक आजच्या स्पर्धेत सहभागी झाले होते. जागतिक पातळीवरील सर्वात अवघड समजली जाणारी साऊथ अफ्रिका येथिल काॅम्रेड अल्ट्रा ह्या 90 किमी अंतराच्या स्पर्धेचा रुट व लोणावळ्यातील रुट समान असल्याने सरावा करिता मागील तिन वर्षापासून लोणावळ्यात टाटा अल्ट्रा ही स्पर्धा आयोजित केली जाते. टाटा अल्ट्रा स्पर्धेतील पात्र खेळाडूंनाच जागतिक पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत असल्याने ही स्पर्धा देशभरातील खेळाडूंना जागतिक स्तरावरील अल्ट्रा स्पर्धेत सहभागी होण्याकरिता महत्वाची असते अशी माहिती या स्पर्धेचे आयोजक व स्टायडर रेस डायरेक्टर दीपक लोंढे व अँथलेटिक फेडरेशन आँफ इंडियाचे आनंद मेनेजेस यांनी पत्रकार परिषदेत दिली.  या स्पर्धेमधून जागतिक स्तरावरील गोल्डन लेव्हल ठरविता येते, सदरची स्पर्धा ही बीएसएफ मान्यताप्राप्त व एएफआयच्या नियमांप्रमाणे घेण्यात येते. भारतातील ही महत्वाची स्पर्धा असून दरवर्षी स्पर्धेत धावपटूंचा सहभाग वाढत आहे ही अभिमानास्पद बाब असल्याचे मेनेजेस यांनी सांगितले. लोणावळ्यातून पहाटे 2.30 वाजता स्पर्धेला सुरुवातलोणावळा येथून रविवारी पहाटे 2.30 वाजता 50 किमी अंतराची व 4.30 वाजता 35 किमी अंतराची स्पर्धा सुरु झाली. लोणावळा, आयएनएस शिवाजी मार्गे घुसळखांब, सहारा इंडिया गेट येथून फिरुन पुन्हा घुसळखांब, तुंग, तिकोना दरम्यान ही स्पर्धा पार पडली. स्पर्धे दरम्यान धावपटूंकरिता 20 ठिकाणी पाण्याचे थांबे, मेडिकल टिम, टेक्निकल टिम तैनात करण्यात आली होती. रात्रीच्या वेळी धावताना खेळाडूंना हेडटाॅर्च लावण्यात आल्या होत्या. पवन मावळातील ग्रामीण भागाचा विकास साधण्याचा ह्या स्पर्धेमागील उद्देश असल्याचे दीपक लोंढे यांनी सांगितले.

टॅग्स :MarathonमॅरेथॉनTataटाटाlonavalaलोणावळा