शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तीन सर्पांना जीवदान

By admin | Updated: November 17, 2016 03:01 IST

नाणोली स्टड फार्ममधील टाकीमध्ये पडलेल्या नाग आणि दोन दिवड या सर्पांना सर्पमित्रांनी पकडून जंगलात सोडून दिले.

करंजगाव : नाणोली स्टड फार्ममधील टाकीमध्ये पडलेल्या नाग आणि दोन दिवड या सर्पांना सर्पमित्रांनी पकडून जंगलात सोडून दिले. स्टड फार्ममधील कर्मचारी दत्तू वाघुले हे काही कामानिमित्त टाकीजवळ गेले असता त्यांना हे सर्प आढळले. त्यांनी सर्पमित्र दक्ष काटकर यांना बोलावून घेतले. दक्ष यांनी टाकीत उतरून प्रथम नागास आणि नंतर दिवडला सुरक्षितरीत्या पकडले. नागास फार्मपासून दूर असलेल्या डोंगरात सोडून दिले आणि दिवड या सापास इंद्रायणी नदीमध्ये सोडण्यात आले. फार्मचे व्यवस्थापक रवी रेड्डी, जगजितसिंग नाथावत आणि स्वित्झर्लंडचे सर्पप्रेमी बर्णाड दुवेर्णाय उपस्थित होते. दिवड हे साप पाण्यात राहणारे आहेत. टाकी खूप मोठी असल्याने, तसेच टाकीतील पाण्याची पातळी खूप कमी असल्याने त्यांना टाकीबाहेर निघणे खूप अवघड झाले होते. नाग हा सर्प उत्तरपूर्व सोडून भारतात सर्वत्र आढळतो. नागाला भारतीय कायद्याचे संरक्षण आहे. अंधश्रद्धेमुळे नागास मारले जाते. ग्रामीण भागात बरेचशे सर्पदंश हे नागाचे असतात आणि ग्रामीण भागातील दवाखान्यात सर्पदंश झाल्यानंतर त्यावरील लस उपलब्ध नसते. त्यामुळे ग्रामीण भागात नागाचा दंश झाल्यानंतर अनेकदा इतर उपचार केले जातात. त्यात अनेकदा नागरिकांचा मृत्यू होतो. सर्पदंशानंतर नागरिकांनी सरकारी दवाखान्यात किंवा शहरातील दवाखान्यात उपचारासाठी जावे, असे आवाहन काटकर यांनी केले. (वार्ताहर)