शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृतवरील शास्ती कमी; पदाधिकारी, नगरसेवकांच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 03:21 IST

शहरातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी महापालिकेने नागरिकांकडून अर्ज मागविले होते. मात्र, जाचक अटी व दंडामुळे नियमितीकरणासाठी आतापर्यंत केवळ ९ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे यामधील रेडिरेकनरनुसार शास्ती आकारण्याची अट शिथिल करण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपाने घेतला आहे.

पिंपरी : शहरातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी महापालिकेने नागरिकांकडून अर्ज मागविले होते. मात्र, जाचक अटी व दंडामुळे नियमितीकरणासाठी आतापर्यंत केवळ ९ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे यामधील रेडिरेकनरनुसार शास्ती आकारण्याची अट शिथिल करण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपाने घेतला आहे. त्यावर मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यातील ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतची निवासी अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी नियमावली राज्य शासनाने ७ आॅक्टोबर २०१७ ला जाहीर केली. त्यानुसार पालिकेने तत्काळ अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली. मात्र, त्यातील जाचक अटी व दंडाचे शुल्क अधिक असल्याने नागरिकांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. गेल्या ५ महिन्यांत केवळ ९ अर्ज पालिकेस प्राप्त झाले आहे.नियमावलीनुसार सध्याच्या रेडीरेकनरनुसार दंडाची रक्कम भरण्याची अट आहे. त्यामुळे साधारण एक गुंठ्यातील बांधकामासाठी तब्बल अंदाजे ५ ते ६ लाख रुपये दंड भरावा लागतो. रेडीरेकनरचा हा दर शिथिल करण्याची उपसूचना सभेत सत्ताधाºयांकडून मांडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसेच, उपसूचनांद्वारे काही जाचक अटी शिथिल केल्या जाणार आहेत. सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव शासनाला पाठवावा लागणार आहे.- निवासी मालमत्ताधारकांना पालिका नोटीस देणार नसल्याचे आश्वासन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शास्तीकराबाबत झालेल्या बैठकीत दिले आहे. निवासी मालमत्तांना जप्तीच्या नोटिसा दिल्या जाणार नाहीत, याबाबत करसंकलन विभागाला सूचना देखील त्यांनी ताबडतोब दिल्या आहेत. परंतु, व्यावसायिक मिळकतधारकांना नोटिसा दिल्या जातील. त्यांच्याकडून शास्तीसह कर वसूल केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे निवासी मालमत्ताधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड