शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

मोशी, डुडुळगावात बिबट्याची दहशत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 02:19 IST

डुडुळगाव (ता. हवेली) वन विभागात शुक्रवारी दुपारी बिबट्या दिसल्याने परिसरात दहशतीचे वातावरण होते. वन विभागाच्या पथकाला चकवा देत बिबट्याने धूम ठोकली. असे असले, तरी शनिवारी सकाळी शेतामध्ये बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले आहेत.

मोशी -  डुडुळगाव (ता. हवेली) वन विभागात शुक्रवारी दुपारी बिबट्या दिसल्याने परिसरात दहशतीचे वातावरण होते. वन विभागाच्या पथकाला चकवा देत बिबट्याने धूम ठोकली. असे असले, तरी शनिवारी सकाळी शेतामध्ये बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले आहेत.आळंदी हद्दीतील गजाननमहाराज संस्थानच्या भक्त निवासाच्या मागील डोंगरावर काळा खडक येथे दुपारी एकच्या सुमारास असलेल्या घरांपाशी महिलेला बिबट्या दिसला. त्यानंतर संबंधित महिलेने आरडाओरडा केल्याने बिबट्याने डुडुळगावकडे धूम ठोकली. बघ्यांची गर्दी उसळल्याने बिबट्याने दाट झुडपांत आश्रय घेतला. पुणे वन परिक्षेत्राचे वन विभाग अधिकारी दुपारी चारच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याने झुडपातून बाहेर पडत धूम ठोकल्यानंतर रेंजरने भूल देण्याचा प्रयत्न म्हणून फायर केले. परंतु तो प्रयत्न अयशस्वी ठरला.दरम्यान, बिबट्या भक्ष्याच्या शोधात रहदारी असलेल्या भागात आला असावा, असा अंदाज व्यक्त केला. मात्र बिबट्याने कोणावरही हल्ला केलेला नाही किंवा त्याच्यामुळे जनावरांना धोका झाला नसल्याचे वन विभागाकडून सांगितले.वन विभागाचे अधिकारी विष्णू गायकवाड, दया ढोमे, अनिल राठोड, भाऊसाहेब शिंदे, दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विवेक लावंड, सहायक पोलीस निरीक्षक गिरी, कात्रज विभागाचे बचाव पथक व पोलीस कर्मचारी यांनी पाहणी केली.डुडुळगाव येथून पुढे बिबट्या गेला असल्याचे सांगितले जात आहे. असे असले, तरी मोशी येथील शेतकऱ्यांच्या शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळले आहेत. राजू आल्हाट यांच्या इनाम खोºयातील शेतात कडीपत्ता आहे. या शेताला त्यांनी दोन दिवसांपूर्वी पाणी दिले होते. शनिवारी सकाळी ते शेतात गेले असता त्यांना शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. त्यामुळे परिसरात पुन्हा भीतीचे वातावरण आहे.

टॅग्स :leopardबिबट्याpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड