शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

एलईडीत ‘अर्थ’कारण; विषयावरून सावळा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 02:33 IST

केंद्राच्या योजनेला विलंब; महापालिकेतील सत्ताधाऱ्यांमध्ये नाही एकमत

पिंपरी : महापालिका क्षेत्रात एलईडी पथदिवे बसविण्याचा केंद्र आणि राज्य सरकारचा निर्णय महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या पचनी पडलेला नसून, ‘अर्थकारणामुळे’ विषय मंजूर, नामंजूर, फेरप्रस्ताव करण्याचा खेळ सुरू आहे. सावळा गोंधळ सुरू असतानाच बुधवारच्या सर्वसाधारण सभेसमोर याबाबतचा प्रस्ताव ठेवला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात ऊर्जा संवर्धनासाठी ३८ हजार ७५५ विविध क्षमतेचे एलईडी दिवे रस्त्यांवर बसविले आहेत. तर विविध रस्त्यांवर ३६ हजार दिवे सोडिअम व्हेपर, मेटल हालाईडचे दिवे कायम आहेत. त्याऐवजी एलईडी दिवे बसविण्यासाठीचे काम देण्याचा विषय आहे. संबंधित संस्था पारंपरिक फिटींग काढून एलईडी फिटींग बसविणार आहे. फिटींगची वॉरंटी सात वर्षे आहे. यामध्ये मध्यवर्ती नियंत्रित कक्षातून दिवे नियंत्रित करण्यात येणार आहेत. तसेच देखभाल-दुरुस्तीचे कामही केले जाणार आहे. यासाठी महापालिकेला खर्च येणार नाही.सद्य:स्थितीतील दिव्यांचा तसेच एलईडी बसविण्यात आल्यानंतर दिव्यांच्या प्रकाश तीव्रतेचा संयुक्तीक पाहणी करून अहवाल तयार के ला जाणार आहे. तसेच दिव्यांची वॉरंटी कालावधी देखभाल-दुरुस्तीसह सात वर्षांचा आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहर सुधारणा समितीच्या २४ जुलैला सभेत हा प्रस्ताव सादर केला. त्या वेळी समितीने हा विषय महिनाभर तहकूब केला होता. त्यानंतर प्रस्तावास मान्यता दिली. प्रस्तावावरील चर्चेत ४ नगरसेवकांनी बाजूने तर दोन सदस्यांनी विरोधात मतदान केले. त्यानंतर विषय मंजूर केला. त्यानंतर शहर सुधारणा समितीच्या ११ सप्टेंबरच्या सभेत हा ठराव रद्द केला.विद्युत विभागाने याबाबतचा प्रस्ताव फेरसादर करावा, असा सदस्य ठराव मंजूर केला. मात्र, बुधवारच्या सर्वसाधारण सभेसमोर हा विषय आला आहे. हा गोंधळ सुरू असतानाच महापालिका प्रशासनाने मंगळवारी सायंकाळी चारला पदाधिकाºयांची तातडीची बैठक बोलाविली आहे. या बैठकीत ऊर्जा संवर्धन धोरणाबाबत सादरीकरण करणार आहे. केंद्र सरकारचा सार्वजनिक उपक्रम असलेल्या संस्थेच्या माध्यमातून महापालिका, नगरपालिकांनी आपल्या हद्दीत एलईडी पथदिवे बसवावेत असे राज्य सरकारने बंधनकारक केले असताना महापालिकेतील भाजपाच्याच स्थानिक पदाधिकाºयांकडून विषयाचा फुटबॉल केला जात असल्याची टीका होत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड