शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीचा गळा आवळून लातूरच्या प्रियकराचा गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 01:41 IST

शहरात खळबळ : सांगवीच्या औंध सर्वोपचार रुग्णालय कर्मचारी वसाहतीतील प्रकार

पिंपरी : औंध सर्वोपचार रुग्णालयाच्या कर्मचारी वसाहतीत मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास आदिती श्यामसुंदर बिडवे (वय १९) या तरुणीचा लातूरहून भेटण्यास आलेल्या तरुणाने वायरने गळा आवळून खून केला. या घटनेनंतर त्याने ओढणीच्या साह्याने स्वत:ही गळफास घेतला. तरुणीशी असलेल्या प्रेमसंबंंधातून ही घटना घडली असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे. नईमोदीन बिल्कोसोद्दीन शहा (वय २१, रा. मूळचा लातूर) असे आरोपीचे नाव आहे. प्रेयसीचा खून केल्यानंतर त्याने स्वत:लाही संपविले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचारी वसाहतीत खोली क्रमांक २०४, टाइप बी इमारतीत राहणारे आदितीचे चुलते, चुलती हे दिवाळी सुटीत गावी गेले आहेत. आदिती आणि तिचा भाऊ शिक्षणासाठी पुण्यात आले असल्याने ते चुलत्यांकडे राहतात. आदितीचा सख्खा भाऊ पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात नर्सिंगचे शिक्षण घेत आहे. परीक्षा असल्याने तो सकाळी घराबाहेर पडला होता. तर चुलत भाऊ अभिनय हा दुचाकी सर्व्हिसिंगसाठी बाहेर गेला होता. घरात आदिती एकटीच होती. तिला भेटण्यासाठी लातूरहून नईमोदीन आला होता. घरात ते दोघेच होते. त्यांच्यात काही कारणास्तव वाद झाला.

रागाच्या भरात आरोपी नईमोदीन याने घरात पडलेल्या इलेक्ट्रिक एक्टेन्शन बोर्डची वायर अदितीच्या गळ्याभोवती गुंडाळली. आदितीचा जीव गुदमरल्याने काही वेळातच आरोपी नईमोदीन याने घरातील ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुचाकी सर्व्हिसिंगला गेलेल्या अभिनवचे दुचाकीचे जॉब कार्ड घरी राहिले असल्याने तो परत घरी आला. घराचा दरवाजा बंद होता. त्याने छोट्या मुलाला घराच्या छताला असलेल्या एका चौकोनी खाच्यातून काही अंतर खाली सोडले. त्या मुलाला तरुण छताला लटकत असल्याचे दिसून आले. काही तरी अघटित घडले असल्याचा अंदाज आल्याने अभिनयने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला. आत पाहिले तर बहीण आदितीसुद्धा मृतावस्थेत पडल्याचे त्याने पाहिले. याबाबत सांगवी पोलिसांना माहिती देण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गळफास घेतलेल्या तरुणाच्या खिशात आधार कार्ड आढळून आले़ त्यावरून तो लातूरचा असल्याचे स्पष्ट झाले. पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औंध सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आले.२०४ क्रमांकाच्या खोलीत जोडीने आत्महत्येची तिसरी घटनाऔंध सर्वोपचार रुग्णालयाच्या कर्मचारी वसाहतीतील २०४ क्रमांकाच्या खोलीत जोडीने आत्महत्येची ही तिसरी घटना आहे. प्रेमिका, प्रियकर अशा एका जोडीने आत्महत्या केल्याची पहिली घटना येथे घडली. त्यानंतर याच खोलीत बहीण, भावाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुसरी घटना घडली होती. त्यानंतर आता आदितीचा खून करून नईमोदीन याने आत्महत्या केल्याची घटना याच खोलीत घडली असल्याची माहिती एस़ व्ही़ गायकवाड, आऱ आऱ घनवट आणि ए. बी़ राठोड या पोलीस कर्मचाºयांनी दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, श्रीकांत पाटील व वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी घटनास्थळी भेट दिली.