शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

रेड झोन हद्दीत जमीन विक्रीचा धंदा तेजीत; सामान्यांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 02:29 IST

इस्टेट एजंट झाले मालामाल, कामगारांचे मात्र हाल

दिघी : रेड झोन आणि खडी मशिन झोनमध्ये कोणत्याही प्रकारचे अधिकृत बांधकाम करता येत नाही. मात्र काही इस्टेट एजंट जमीन विक्रीची जाहिरात सर्रास करत आहेत. कमी दरात गुंठेवारी आकारून एक गुंठ्यापासून ते अकरा गुंठ्याचे प्लॉट खरेदी सकट देण्याच्या भूलथापांना व अशा बोगस जाहिरातबाजीला सर्वसामान्य बळी पडत आहेत.मध्यमवर्ग असलेला बहुतांश कामगार वर्ग बेकायदा प्लॉट खरेदी करत असून, रेड झोन आणि ग्रीन झोनमधील प्लॉटविक्री करण्यास लॅण्डमाफिया आता चांगलेच सोकावले आहेत. त्यांच्यावर कुणाचाही वचक राहिला नाही. त्यामुळे सामान्य कष्टकरी वर्गाची मोठ्या प्रमाणात फसगत होत आहे. काही कुटुंब देशोधडीला लागत आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.काही वर्षांपासून इस्टेट एजंटची टोळी दिघी, चक्रपाणी वसाहत, सद्गुरूनगर, खडी मशिन रस्ता, तळवडे, बोराडेवाडी, जाधववाडी या भागात कार्यरत आहे. ज्या जागेवर अधिकृतपणे बांधकाम उभे राहू शकत नाही आणि भविष्यात कधीही विकत घेतलेली जागा ग्राहकांच्या नावावर होऊ शकत नाही, अशी रेड झोन आणि ग्रीन झोनमधील जागा अनधिकृतपणे ग्राहकांच्या माथी मारल्या जात आहेत. विशेष म्हणजे या सर्व बेकायदा प्रकाराला राजकीय वरदहस्त मिळत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.शहरात सध्या फसव्या प्लॉट विक्री करणाऱ्यांचा सुळसुळाट आहे. कसलीही खातरजमा न करता ग्राहक एजंटांच्या भूलथापांना बळी पडत असून, आपल्या आयुष्याची जमापुंजी प्लॉट खरेदीसाठी लावत आहेत. मात्र, रेड झोन किंवा ग्रीन झोनमधील विकत घेतलेल्या जागेवर बांधकाम करण्यास महापालिका परवानगी देत नाही आणि ती जागा ग्राहकांच्या नावावरदेखील होत नाही. त्यामुळे ग्राहकांवर पश्चातापाची वेळ येत आहे.बेकायदा प्लॉट विक्रीतून लाखो रुपये कमावणाºया आणि सर्वसामान्य ग्राहकांना लुटणाºया इस्टेट एजंटला लगाम कधी घालणार, असा संतप्त सवाल नागरिकांमधून व्यक्त होत आहे. अशाच फसगत झालेल्या ग्राहकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले रेड झोनमधील जागेच्या सातबारा कागदपत्रावर रेड झोनची नोंद नसल्याचा फायदा घेत काही प्लॉट विक्रत्याने मला खोटी कागदपत्रे दाखवून पांजळ पोळ चौकामागील रेडझोनच्या प्लॉटची विक्री केली होती. पण त्या जागेचा कागद करण्यास दस्त कार्यालयाने विरोध केल्यावर हा सर्व प्रकार मला समजला. पण तोपर्यंत फार उशीर होऊन मी बारा लाख रुपयांस मुकलो. तसेच पुढील टोळी बलाढ्य व त्यांचे हात वरपर्यंत असल्याने मला काहीच करता आले नाही. असाच फसवणुकीचा प्रकार व घटना अनेकांबरोबर घडल्या आहेत.रेड झोन आणि ग्रीन झोनमधील जागेचा व्यवहार हा अनधिकृत समजला जातो. मात्र तरीही काही इस्टेट एजंट राजकीय व्यक्तींच्या नावाचा वापर करून बेकायदा धंदा करीत आहेत. अनधिकृत प्लॉटविक्री करण्याचा धंदा आता राजरोसपणे सुरू आहे. आपल्या नावाचा, पदाचा कोणी गैरवापर करत असेल तर लोकप्रतिनिधींनी त्यावर आक्षेप घेणे अपेक्षित आहे. परंतु लोकप्रतिनिधींकडून तसे होत नसल्यामुळे अशा प्रकारच्या अनधिकृत धंद्यांना बळ मिळत असून, याला जबाबदार कोण? प्रशासकीय यंत्रणा काय करते, असे संतप्त सवाल आता नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड