शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

महापालिकेचे अठरा विद्यार्थी होणार लखपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 05:34 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेने ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी एक लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी एक लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. यावर्षीच्या निकालानुसार अठरा विद्यार्थीं लखपतीच्या बक्षीसास पात्र ठरले आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अठरा शाळा आहेत. यापैकी पिंपळे सौदागर येथील माध्यमिक विद्यालयातील सहा, पिंपळे गुरव माध्यमिक विद्यालयातील पाच, भोसरी आणि निगडी माध्यमिक विद्यालयातील दोन, चिंचवड, आकुर्डी आणि काळभोरनगर या माध्यमिक विद्यालयांतील प्रत्येकी एका विद्यार्थ्याने ९० टक्क्यांच्या पुढे गुण प्राप्त केले आहेत. यांना एक लाख रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेल्यांमध्ये पिंपळे सौदागर येथील माध्यमिक विद्यालयातील सात, कासारवाडीत चार, निगडीत दोन, पिंपरीनगर, पिंपळे गुरव, लांडेवाडी, नेहरुनगर आणि संत तुकारामनगर माध्यमिक विद्यालयातील प्रत्येकी एका विद्यार्थ्याला ८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. त्यांना पन्नास हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. तर, पिंपळे सौदागर, केशवनगर माध्यमिक विद्यालयातील प्रत्येकी सहा, कासारवाडी, क्रीडा प्रबोधिनी विद्यालयातील प्रत्येकी चार, रुपीनगर तीन, निगडी दोन, काळभोरनगर, भोसरी आणि संत तुकारामनगर माध्यमिक विद्यालयातील प्रत्येकी एका विद्यार्थ्यांला ८० टक्के गुण प्राप्त झाले आहेत. या विद्यार्थ्यांना पंचवीस हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.गुणवंतांसाठीबक्षीस योजनामहापालिकेतर्फे ८० टक्क्यांहून अधिक गुण घेणाºया विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन सत्कार केला जातो. ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्याला एक लाख, ८५ टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केलेल्यास पन्नास हजार रुपये आणि ऐंशी टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पंचवीस हजार रुपयांचे बक्षीस दिले जाते.

टॅग्स :SSC Results 2018दहावी निकाल २०१८