शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

त्या जोडप्यांना लाखाचे अनुदान, दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 06:13 IST

धडधाकट वधू किंवा वराने दिव्यांगाचा स्वीकार करून विवाह केल्यास त्यांना चांगले जीवन जगता येणार आहे. यासाठी दिव्यांग विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जोडप्याला एक लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

पिंपरी : धडधाकट वधू किंवा वराने दिव्यांगाचा स्वीकार करून विवाह केल्यास त्यांना चांगले जीवन जगता येणार आहे. यासाठी दिव्यांग विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जोडप्याला एक लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. या प्रस्तावाला महिला व बालकल्याण समितीने आयत्या वेळी मान्यता दिली.महिला व बाल कल्याण समितीची बैठक नुकतीच झाली. अध्यक्षस्थानी सभापती सुनीता तापकीर होत्या. समितीच्या बैठकीस सागर अंगोळकर, डॉ. वैशाली घोडेकर, योगिता नागरगोजे, प्रा. सोनाली गव्हाणे, चंदा लोखंडे, सुलक्षणा धर, निकिता कदम, रेखा दर्शिले आदी उपस्थित होते.दरम्यान, कोपर्डी प्रकरणातील तीनही दोषींना फाशीची शिक्षा सुनावल्याबद्दल समितीने अहमदनगर न्यायालयाच्या निर्णयाचा स्वागत केले. पीडित निर्भयालाश्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचा अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. महिलांवरील अत्याचार प्रवृत्तीचा सदस्यांनी निषेध केला.सभेत किडस् सिटीचा विषय मंजूर करण्यात आला. सिटीमुळे शहरातील लहान मुलांना विविध कामकाजाचे प्रात्यक्षिक मिळणार असून, प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव घेता येणार आहे. मुलांच्या व्यावसायिक ज्ञानात भर पडणार आहे. त्यासाठी महिला व बाल कल्याण निधीतून सुमारे चाळीस कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. समितीच्या शिफारशीसह हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात आला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड