शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात सावळागोंधळ, औषधांचा तुटवडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 21:14 IST

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात औषधांचा तुटवडा जाणवत आहे. भांडार विभागाकडून औषधांची खरेदी करण्यात विलंब होत आहे.

पिंपरी : महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात औषधांचा तुटवडा जाणवत आहे. भांडार विभागाकडून औषधांची खरेदी करण्यात विलंब होत आहे. तसेच  ६० कंत्राटी परिचारिकांची मुदत संपल्याने कर्मचाºयांची कमतरता भासत आहे. प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचे साफ दुर्लक्ष होत आहे. वैद्यकीय विभागाचा हा भोंगळ कारभार आहे, असा आरोप नगरसेविका सुलक्षणा शीलवंत-धर यांनी केला आहे.महापालिकेच्या वायसीएममध्ये अल्प दरात उपचार होत असल्यामुळे गोरगरीब रुग्णांची मोठ्या प्रमाणात उपचारासाठी गर्दी होते. पिंपरी-चिंचवड, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून याठिकाणी रुग्ण उपचारासाठी येत आहेत. रुग्णालयात आल्यानंतर चांगले उपचार मिळतील अशी रुग्णांमध्ये आशा असते; मात्र औषधांचा नेहमीचाच तुटवडा व डॉक्टर्स आणि नर्सेस ची कमतरता यांमुळे रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नाहीत. रुग्णालयात डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचाºयांचा अनेक महिन्यांपासून तुटवडा आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसांत शहरात साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून, वायसीएम रुग्णालयात रुग्णांची वर्दळ वाढली आहे़ त्यातच रुग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून औषधांचा तुटवडा जाणवत आहे. यासाठी धर यांनी आयुक्तांना पत्र दिले आहे. सुलक्षणा शीलवंत-धर म्हणाल्या, ‘‘टायफॉईड, डेंगी, मलेरिया, स्वाइन फ्लू अशा जीवघेण्या आजारांचा प्रादुर्भाव वाढत असतानाच शहरातील सर्वांत मोठी वैद्यकीय सेवा पुरवणाºया वायसीएमकडे सत्ताधारी आणि प्रशासन दुर्लक्ष करत आहे. औषधे उपलब्ध नसल्याने रुग्णांना हजारो रुपयांची औषधे, खासगी औषध विक्रेत्यांकडून विकत घ्यावी लागतात. रुग्णालयांत औषधे का उपलब्ध होत नाहीत यामागे नक्की काय गौडबंगाल आहे याची चौकशीही झाली पाहिजे.’’

टॅग्स :hospitalहॉस्पिटलmedicineऔषधं