शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध, अपंगांच्या मूलभूत सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 01:29 IST

न्यायालयीन कामकाजानिमित्त येणाऱ्या अपंग व्यक्तींसाठी पिंपरीतील मोरवाडी न्यायालयाच्या इमारतीला रॅम्प नाही.

पिंपरी : न्यायालयीन कामकाजानिमित्त येणाऱ्या अपंग व्यक्तींसाठी पिंपरीतील मोरवाडी न्यायालयाच्या इमारतीला रॅम्प नाही. त्याचबरोबर लिफ्ट सुविधा नसल्याने वयोवृद्धांना दोन मजले पायºया चढून जाताना दमछाक होते. मूलभूत व आवश्यक सुविधांचा अभाव असल्याने अपंग आणि वृद्धांचीप्रचंड गैरसोय न्यायालयाच्या आवारात होते.पिंपरी-चिंचवड शहरासाठी मोरवाडी येथे दिवाणी व फौजदारी न्यायालय आहे. या ठिकाणी येणाºया पक्षकार, तसेच वकिलांना बसण्यासाठी पुरेशी जागा नाही ही वस्तुस्थिती आहे. वकिलांसाठी उपलब्ध करून दिलेल्या कक्षात जेमतेम १० ते १२ वकील बसू शकतात. महिला वकिलांसाठी असलेल्या कक्षात तर केवळ चार ते पाच महिला वकील बसू शकतील, एवढीच जागा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी न्यायालयीन कामकाजासाठी येणाºया अपंग व्यक्तींना पायºया चढून जाणे शक्य नाही. त्यांना रॅम्पची सुविधा उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर वयोवृद्ध पक्षकारांना दोन मजले पायºया चढून जाणे जिकिरीचे ठरते. त्यांच्यासाठी लिफ्ट सुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजे.गेल्या काही वर्षांत या सुविधा पुरविण्यासंदर्भात कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाची नियमित साफसफाई केली जात नाही. त्यामुळे त्या परिसरात दुर्गंधी पसरली जात आहे. न्यायालयाचे प्रशासकीय व्यवस्थापन व पिंपरी-चिंचवड अ‍ॅडव्होकेट बार असोसिएशन यांच्या वतीने सुविधा मिळाव्यात यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. मात्र, महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून दुर्लक्ष झाल्याने सुविधांची पूर्तता होऊ शकलेली नाही.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड