शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या पैशांसाठी पत्नीचा निर्घृण खून करणारा अवघ्या १३ दिवसांत कामशेत पोलिसांकडून जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 18:29 IST

इंद्रायणी कॉलनीत दारू पिण्यासाठीच्या पैशांवरून पती पत्नीत झालेल्या वादातून चिडून जाऊन पत्नीचा मानेवर धारधार हत्याराने वार करून निर्घृण खून करून पसार झालेल्या दारुड्या पतीला पकडण्यात कामशेत पोलिसांना मंगळवारी यश आले.

ठळक मुद्देदारूच्या नशेत हिरामण कांबळे आपल्या पत्नीला नेहमीच करीत असे मारहाणपत्नीच्या मानेवर डाव्याबाजूस धारधार हत्याराने मारून, खून करून केला होता पोबारा

कामशेत : येथील इंद्रायणी कॉलनीत दारू पिण्यासाठीच्या पैशांवरून पती पत्नीत झालेल्या वादातून चिडून जाऊन पत्नीचा मानेवर धारधार हत्याराने वार करून निर्घृण खून करून पसार झालेल्या दारुड्या पतीला पकडण्यात कामशेत पोलिसांना मंगळवारी यश आले.या प्रकरणी कामशेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय एस पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे, पोलीस हवालदार समीर शेख, पोलीस नाईक वैभव सकपाळ, विशाल बोऱ्हाडे, राम कानगुडे, संतोष घोलप व संदीप शिंदे यांच्या टीमने मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हिरामण बसप्पा कांबळे (वय ४१) यास मंगळवार (दि. २३) रोजी पुणे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे करीत आहेत.हिरामण बसप्पा कांबळे (वय ४१), रुपाली हिरामण कांबळे (वय ३५), दोन मुले कुणाल व कुशल (वय १० व ५ वर्ष ) हे कुटुंब कामशेत मधील इंद्रायणी कॉलनीत गणपती मंदिराच्या बाजूस रुपाली हिच्या भावाच्या मालकीच्या घरात राहण्यास होते. हिरामण कांबळे हा व्हीपीएस हायस्कूल लोणावळा येथे शिपाई पदावर नोकरीस होता. त्याला दारूचे व्यसन होते. यावरून दारूच्या नशेत तो आपल्या पत्नीला नेहमीच मारहाण करीत असे. दारू पिण्यासाठी पैसे मागत असे. यावरून दोघांमध्ये कायम वाद होत असत. यातूनच गुरुवार (दि. ११) रोजी सकाळी ९ ते १० वाजण्याच्या सुमारास हिरामण कांबळे याने त्याची पत्नी रुपालीच्या मानेवर डाव्याबाजूस धारधार हत्याराने मारून तिचा खून करून कपड्याची बॅग भरून पोबारा केला होता. या प्रकरणी महिलेच्या भावाने पोलिसात फिर्याद दिली होती.

टॅग्स :kamshetकामशेतpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड