शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पाच दिवसांत केले ‘किलीमांजरो’ सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 02:08 IST

गिर्यारोहक सचिन कणसे या तरुणाने आफ्रिका खंडातील सर्वोच्च किलीमांजरो शिखर सर केले आहे.

सांगवी : पिंपळे निलख येथील गिर्यारोहक सचिन कणसे या तरुणाने आफ्रिका खंडातील सर्वोच्च किलीमांजरो शिखर सर केले आहे. या शिखरावर तिरंगा फडकावत कणसे याने शहरवासीयांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.पुणे व परिसराचे नाव उंचावणाऱ्या विविध खेळाडू, कलाकार, राजकीय, सामाजिकव इतर क्षेत्रांतील व्यक्तींमध्ये सचिनच्या कामगिरीची नोंद झाली आहे. मोठी बहीण जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्राध्यापिका सविता दगडे यांना सचिनने हे यश समर्पित केले.अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबातून आई-वडिलांनी बहीण सविता व सचिन यांना शिकवले. सविता प्राध्यापिका, तर सचिन वीटभट्टी व्यावसायिक आहे. शाळेत कबड्डी व मैदानी खेळ यामुळे सह्याद्रीच्या रांगा, कडेकपारी पार करत गिर्यारोहणाचे वेड डोक्यात भिनले, असे सचिनने सांगितले. सन २०१६ मध्ये लडाखमधील लेह येथील स्टोक कांग्री, युरोप खंडातील सर्वांत उंच माउंट एलब्रूस शिखर सर केले. गिर्यारोहणासाठी रोज पाच किलोमीटर चालणे, योगासने, नियमित व्यायाम व खेळ यामुळे उंच शिखर सर करणे शक्य झाले, असे सचिनने सांगितले.बाणेर येथील तुकाई टेकडीवरील वसुंधरा अभियान या सामाजिक संस्थेचा सचिन सभासद आहे. पर्यावरण व विविध सामाजिक कार्यांत तो भाग घेत असतो. शिखर सर केल्यामुळे सचिनवर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.तिरंगा फडकावत आई-वडिलांचे छायाचित्र झळकावलेआफ्रिकेतील सर्वोच्च शिखर १९ हजार ३४१ फूट उंच आहे. ९ आॅगस्ट रोजी सकाळी सातला प्रत्यक्ष शिखर चढाईसाठी सुरुवात करून १३ आॅगस्ट रोजी सकाळी ११ला सचिनने शिखर सर केले. खडतर अशा किलीमांजरो या शिखरावर गिर्यारोहण कालावधीसाठी सात दिवस लागतात. सचिनने मात्र अवघ्या पाच दिवसांत शिखर सर केले; तिरंगा फडकावला. त्यानंतर आपल्या आई-वडिलांचे छायाचित्रही झळकावले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड