शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

वर्षाविहारासाठी खंडाळा, लोणावळ्यात पर्यटकांची तुडुंब गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 05:28 IST

मागील आठवड्यात भुशी धरण ओव्हर फ्लो झाल्याचे समजल्यानंतर या धरणाच्या पायऱ्यांवरून वाहणाºया पाण्यात बसून चिंब भिजण्याचा व वर्षाविहाराचा आनंद घेण्याकरिता आज मोठ्या संख्येने पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले.

लोणावळा : मागील आठवड्यात भुशी धरण ओव्हर फ्लो झाल्याचे समजल्यानंतर या धरणाच्या पायऱ्यांवरून वाहणाºया पाण्यात बसून चिंब भिजण्याचा व वर्षाविहाराचा आनंद घेण्याकरिता आज मोठ्या संख्येने पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले. मात्र पावसाने मागील काही दिवसांपासून शहरात दांडी मारल्याने आज पर्यटकांना कडक उन्हाचा सामना करावा लागला.भुशी धरणाच्या पायºयांवरून वाहणारे पाणी कमी झालेले असतानादेखील धरणावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. अनेक जण पाणी दिसेल त्या ठिकाणी भिजण्याचा आनंद घेत होते. सहारा पुलावरील दोन्ही धबधबे पावसाअभावी कोरडे पडले होते, तर गिधाड तलाव येथील धबधब्यातून पडणाºया पाण्याखाली पर्यटकांची गर्दी झाली होती. लायन्स पॉइंट व शिवलिंग पॉइंट येथे पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. मात्र पावसाअभावी सर्वत्र पर्यटकांचा हिरमोड झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. लायन्स पॉइंट येथे पोलीस प्रशासन, तसेच वन विभागाचे कर्मचारी नसल्याने पर्यटक बिनदिक्कतपणे सुरक्षा रेलिंगच्या पुढे धोकादायकपणे दरीच्या तोंडाजवळ फोटो काढण्याकरिता जात होते. खंडाळ्यातील राजमाची पॉइंट येथेदेखील सुरक्षेची उपाययोजना नसल्याने पर्यटक धोकादायकपणे दरीच्या तोंडावर जाऊन फोटो काढण्याचा प्रयत्न करतात. हे दोन्ही पॉइंट वन विभागाच्या जागेत असल्याने त्यांनी येथील सुरक्षेकडे लक्ष देणे गरजेचे आहे.मोठ्या संख्येने पर्यटक आज लोणावळ्यात आल्याने मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर झालावाडी ते गवळीवाडा नाका व गवळीवाडा नाका ते एल अ‍ॅन्ड टी ट्रेनिंग सेंटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. भुशी धरणाकडे जाणाºया मार्गावररायवूड कॉर्नर ते थेट भुशी धरण अशी पाच किमी अंतरापर्यंत व परतीच्या मार्गावर भुशी गाव ते आयएनएस शिवाजी गेटपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतराकरिता पर्यटकांना तास-दोन तास वाहतूककोंडीचा सामनाकरावा लागला. वाहतूक नियोजनाकरिता, तसेच धरण सुरक्षेकरिता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.दुप्पट दराने हुक्का विक्रीलायन्स पॉइंटवर खुलेआम सुरू असलेल्या हुक्का विक्रीवर मागील पंधरावड्यात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कारवाई केल्यानंतर येथील हुक्का विक्री बंद होण्याऐवजी ती दुप्पट दराने व छुप्या पद्धतीने सुरू झाली आहे. हुक्क्याच्या एका पॉटकरिता एक हजार ते बाराशे रुपये घेऊन पर्यटकांना त्यांच्या गाडीत अथवा पॉइंटपासून काही अंतरावर हुक्का लावून देण्याची तजवीज केली जात असल्याचे पाहणीमध्ये निदर्शनास आले. हुक्काविक्रेत्यांना हुक्का एवढा महाग का विकता, अशी विचारणा केली असता पोलीस कारवाई करतात. त्यांना हप्ता द्यावा लागतो. तुम्हाला हवा तेवढा हुक्का मिळेल, असे विक्रेत्यांनी सांगितले.त्यांना रोखणार कोण?लायन्स पॉइंटच्या दरीजवळ जाणे धोकादायक आहे. सुरक्षा रेलिंगच्या पुढे जाऊ नका, असे बोर्ड वन विभागाने लावलेले असतानादेखील पर्यटक या सूचनांकडे काणाडोळा करीत रेलिंगच्या पुढे जात आहेत. अनेक ठिकाणचे रेलिंगच गायब झाले आहेत. स्थानिकांनी सूचना केली तरी दुर्लक्ष करत पर्यटक हुल्लडबाजी करत आहेत. या हुल्लडबाजांवर कारवाई होत नाही.

टॅग्स :lonavalaलोणावळा