देहूरोड : कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागांचा कौल भाजपच्या बाजूने स्पष्ट झाल्यानंतर देहूरोड शहर भाजपचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हातात पक्षाचे झेंडे घेऊन नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, महर्षी वाल्मिकी चौक आणि वृंदावन हॉटेल चौकात लाडू वाटप करून तसेच रस्त्यावर फटाके वाजवून जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. देहूरोड भाजपचे शहराध्यक्ष अॅड कैलास पानसरे, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल, जेष्ठ नेते सिताराम चौरे, मदनलाल सोनिगरा, गुरमितसिंग, जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष लहू शेलार, उमेश जैन, बाळासाहेब शेलार,अनिल खंडेलवाल, प्रवक्ते संजय पिंजण आदींनी मंगळवारी कर्नाटक राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचा आनंद फटाके वाजवून तसेच लाडू व पेढे वाटून एकच जल्लोष साजरा केला.
कर्नाटकात विजय मिळाल्याने देहूरोडमध्ये भाजपकडून जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 16:05 IST
कर्नाटक निवडणुकीत भाजप ने सर्वाधिक जागा जिंकत सत्ता स्थापनेच्या दृष्टीने एक पाऊल टाकले. देहूरोड भाजप कार्यकर्त्यांनी त्याचा आनंदोत्सव साजरा केला.
कर्नाटकात विजय मिळाल्याने देहूरोडमध्ये भाजपकडून जल्लोष
ठळक मुद्देकार्यकर्त्यांनी हातात झेंडे घेऊन लाडू वाटप, फटाके वाजवून केला विजय साजरा