शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

काजल लवटे लाखाची मानकरी, परिस्थितीवर मात करून मिळविले ९५ टक्के गुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 02:02 IST

इच्छा असली की, सर्व काही साध्य होते, ही म्हण खरी करून दाखविली पिंपळे सौदागर येथील अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी काजल लवटे हिने. बिकट परिस्थितीवर मात करीत तिने यश संपादन केले.

रहाटणी - इच्छा असली की, सर्व काही साध्य होते, ही म्हण खरी करून दाखविली पिंपळे सौदागर येथील अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी काजल लवटे हिने. बिकट परिस्थितीवर मात करीत तिने यश संपादन केले. भाड्याच्या छोट्याशा खोलीत अभ्यासाला जागा नसतानाही तिने ही किमया साधली आहे. घरातील सर्व सदस्य झोपल्यावर रात्रभर अभ्यास करून तिने दहावीत ९५ टक्के गुण मिळवून शाळेत पहिला क्रमांक मिळविला. या यशामुळे महापालिकेच्या बक्षीस योजनेतील लाखाची ती मानकरी ठरली आहे. त्यामुळे तिचे कौतुक होत आहे.आपल्याला काहीतरी करायचे आहे, ही जिद्द ती उराशी बाळगून होती. एका १० फूट बाय १० फूट रुंदीच्या खोलीत राहात असल्याने अभ्यासाला जागा शिल्लक नसायची. त्यामुळे अभ्यास करणार कसा, हा प्रश्न तिच्यासमोर होता; मात्र न डगमगता ती रात्री घरातील सर्व झोपली की, ती अभ्यासाला बसायची.मग पहाट कधी झाली त्याचे भानही तिला नसे. पुन्हा आई कामाला गेली की, घरातील काम करून पुन्हा शाळा, मात्र परिस्थितीवर मात करून शाळेत तिने पहिला क्रमांक पटकाविला. तिला उच्चशिक्षित होण्याचे स्वप्न असून समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. पुढील काळात अधिक कष्ट करून आईवडिलांची इच्छा पूर्ण करायची असल्याचे काजल हिने सांगितले. महापालिकेच्या बक्षीस योजनेत लाख रुपये मिळणार ते सर्वच शिक्षणासाठी खर्च करण्यात येणार आहे. भविष्यात माझी बहीणही माझ्या पावलावर पाऊल ठेवत जास्तीत जास्त गुण कशी मिळविणार यासाठी तिला मार्गदर्शन करणार आहे. दहावीतील विद्यार्थ्यांनी न घाबरता अभ्यास करावा; तसेच अभ्यासाचा दिनक्रम ठरविला तर जास्त त्रास होत नाही. मेहनतीचे फळ नेहमी चांगलेच मिळते. त्यामुळे आपल्या परिस्थितीला दोष देत बसू नये. त्यावर मात करायला शिकले पाहिजे, असे काजल लवटे हिने सांगितले.नशिबी अठराविश्वे दारिद्रय असल्याने लवटे कुटुंबीय कामाच्या शोधात १५ वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाले. वडील मजुरी करतात. आई मिळेल ते काम करते. घरची परिस्थिती बेताची. कामाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आईवडील कामावर गेल्यावर घरातील कामाची जबाबदारी काजलवर असे. त्यामुळे शाळा करून घरातील काम हा तिच्या दिनचर्येचा भाग झाला.

टॅग्स :SSC Results 2018दहावी निकाल २०१८pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड