शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पीडितांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देणार - विजया राहटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 01:55 IST

पिंपरी व हिंजवडी येथील दोन्ही घटना मन सुन्न करणाऱ्या आहेत. या घटनेतील तपासाबाबत पोलिसांना सहकार्य करणे आवश्यक आहे.

पिंपरी - पिंपरी व हिंजवडी येथील दोन्ही घटना मन सुन्न करणाऱ्या आहेत. या घटनेतील तपासाबाबत पोलिसांना सहकार्य करणे आवश्यक आहे. तसेच, दोन्ही घटनेतील पीडित मुलींच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य महिला आयोग प्रयत्न करणार असल्याचे, आश्वासन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिले.या वेळी महापालिकेचे पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या सभापती ममता गायकवाड, अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, नगरसेवक शीतल शिंदे, नामदेव ढाके, भाजपा नेत्या उमा खापरे, शिक्षण समितीच्या सभापती सोनाली गव्हाणे, विधी समितीच्या माजी सभापती शारदा सोनवणे, महिला आघाडी शहराध्यक्षा शैला मोळक आदी उपस्थित होते.पिंपरीतील रमाबाईनगर येथून सात वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन हत्या केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला होता. तसेच, कासारसाई येथील ऊसतोडणी मजुरांच्या दोन अल्पवयीन मुलींवर नराधमांनी केलेल्या अत्याचाराची घटना नुकतीच घडली आहे. या दोन्ही घटनेतील पीडित कुटुंबीयांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी शुक्रवारी भेट घेतली. तसेच, पोलीस आयुक्तालयात अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांच्याशी चर्चा केली.रहाटकर म्हणाल्या,‘‘पिंपरी येथील घटनेतील आरोपींच्या शोधासाठी बाहेरच्या राज्यातही पोलिसांनी पथके पाठवलेली आहेत. या घटनेच्या तपासाबाबत पोलिसांची संपूर्ण यंत्रणा कामाला लागलेली आहे. तसेच, आरोपींना कडक शिक्षा होण्यासाठी राज्य महिला आयोग प्रयत्न करणार आहे. समाजानेही नराधमी प्रवृती रोखण्याची गरज असून विकृत मानसिकता वेळीच ठेचून काढली पाहिजे. तसेच, पीडित मुलींच्या कुटुंबीयांना लवकर न्याय मिळवून देणार आहे. देशभरातील अशा घटना थांबविण्यासाठी केंद्र सरकारने बाल लैंगिक अत्याचार कायद्यात बदल केला असून, या कायद्यात आरोपींना होणाºया शिक्षेची अंमलबजावणी तत्काळ करण्याची तरतूद केली आहे. या कायद्यातील बदलामुळे समाजातील विकृत मनोवृत्ती निश्चितपणे कमी होतील.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या