शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

लाडक्या श्रीगणरायाचे स्वागत करण्यासाठी अवघी उद्योगनगरी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 06:00 IST

लाडक्या श्रीगणरायाचे स्वागत करण्यासाठी अवघी उद्योगनगरी सज्ज झाली आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येलाच घराघरात बाप्पा आणण्याची प्रथा असल्याने बाप्पाचे मंगलमय आगमन झाले असून, शुक्रवारी विधिवत प्राणप्रतिष्ठा करून दहा दिवस उत्सवाच्या पवित्र सुगंधाची उधळण सांस्कृतिक शहरात होणार आहे

पिंपरी : लाडक्या श्रीगणरायाचे स्वागत करण्यासाठी अवघी उद्योगनगरी सज्ज झाली आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येलाच घराघरात बाप्पा आणण्याची प्रथा असल्याने बाप्पाचे मंगलमय आगमन झाले असून, शुक्रवारी विधिवत प्राणप्रतिष्ठा करून दहा दिवस उत्सवाच्या पवित्र सुगंधाची उधळण सांस्कृतिक शहरात होणार आहे.तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता अशी प्रचिती असलेल्या श्रीगणेशाच्या घराघरातील आगमनाने भक्तांच्या मनावरील निराशेचे मळभ दूर होऊन एक नवा उत्साह निर्माण झाला आहे. त्याच्या स्वागतासाठी घरांमध्ये सजावटीचा अनोखा साज चढविण्यात आला आहे. पुढील दहा दिवस ढोलताशांचे निनाद, गौरीचे आगमन, गोडाधोडाचे नैवैद्य, याची रेलचेल पाहायला मिळणार आहे. गुरूवारचा पूर्वदिवस महिलांसह गणेश मंडळाच्या कार्यकतर््यांसाठी अधिकच गडबडीचा होता. पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी या परिसरातील चौकाचौकांत गणेशमूर्तींचे स्टॉल लागले असल्याने भाविक श्रींच्या मूर्तीचे बुकिंग करताना दिसत होते. अनेक आबालवृद्ध खास ठेवणीतला पेहराव करून श्रींची मूर्ती घेऊन जात होते. या वर्षी पर्यावरणाचा विचार करून अनेक भाविकांनी आवर्जून प्लॅस्टर आॅफ पॅरिसऐवजी शाडूची मूर्ती पसंत दिली. चारचाकी, दुचाकी वाहनांमधून श्रींच्या मूर्ती नेण्याचे प्रमाण मोठे होते. कमळ-केवडा, जास्वंद, दुर्वा-हार-फुले आणि फळे या पूजा साहित्याच्या खरेदीसाठी पिंपरीतील मंडईचा परिसर गजबजून गेला होता. सायंकाळी पाय ठेवायला देखील जागा नव्हती.